नवी दिली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवीर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रीय पक्षांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फेरी झडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीकाँग्रेसच्या घराणेशाहीवर अनेकदा टीका करताना दिसतात. आज त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर घराणेशाहीवरून टीकास्त्र सोडले. त्यावर काँग्रेसकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आज काँग्रेसवर वंशवादाचा आरोप केला. यावर काँग्रेसकडून मोदींवर वैयक्तीक टीका करण्यात आली आहे. मोदींचा वंशच नाही, ते वंशवादावर कसकाय बोलू शकतात, असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. याला भाजपकडून काय उत्तर मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मोदींकडे त्याचां वंशच नाही, त्यामुळे ते काँग्रेसवर वंशवादाची टीका करत आहेत. मुळात ज्याचा वंशाच नाही, तो वंशवादावर बोलूच कसा शकतो. जगात कुठलाही एक व्यावसाय़ सांगा जो त्या घरातील लोक पुढे चालवत नाही. त्याचप्रमाणे राजकारणात आहे. तसेच इतर व्यावसायात होते. मोदींना आपला वंश वाढवायचा नाही, त्यामुळे ते घराणेशाही आणि वंश यावर राजकारण करत असल्याचे काँग्रेसचे तारिक अन्वर यांनी म्हटले आहे.
अन्वर यांनी घराणेशाहीचे समर्थन करताना जगात सगळीकडेच आपला वंश पुढे नेला जातो असे म्हटले आहे. यावर भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.