नवी दिल्ली : नोटाबंदीच्या आधीपेक्षाही अधिक नोटा चलनात असल्याची रिझर्व्ह बँकेची आकडेवारी असली, तरीही अनेक शहरांतील एटीएममध्ये खडखडाट आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, सरकारने लादलेली ही छुपी नोटाबंदी तर नाही, असा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक राज्यांतून २,००० रुपयांच्या नोटांसह अन्य नोटाही गायब झाल्या आहेत.कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजधानी दिल्लीच्या काही भागांत तीव्र नोटाटंचाई निर्माण झाली आहे. लोक समाजमाध्यमांतून याबाबत आवाज उठवित आहेत. सणामुळे नोटांची मागणी वाढली आहे. त्यामुळे ही टंचाई निर्माण झाल्याचे रिझर्व्ह बँकेने एका वृत्तवाहिनीला सांगितले.केंद्रीय वित्त राज्यमंत्री एस.पी. शुक्ला यांनी सांगितले की, आज घडीला १,२५,००० कोटी रुपयांच्या नोटा आमच्याकडे आहेत. समस्या अशी आहे की, काही राज्यांत नोटा कमी आहेत, तर काहीमध्ये जास्त आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नोटा पाठविण्यासाठी सरकारने राज्यनिहाय समित्या स्थापन केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनेही एक समिती बनविली आहे. तीन दिवसांत समस्या दूर होईल.राज्यात खडखडाट अन् रांगाराज्यात मंगळवारी काही ठिकाणी एटीएममध्ये खडखडाट होता तर काही ठिकाणी एटीएमबाहेर रांगा लागल्या होत्या. ठाण्यात अनेक ठिकाणी नोटांची चणचण जाणवली. पैसे काढण्यासाठी पुणेकरांनी रांगा लावल्या होत्या. जळगाव, नाशिकमध्ये चलन टंचाई जाणवली. मराठवाड्यातही दोन दिवसांपासून टंचाई आहे.मध्य प्रदेश : भोपाळ शहरातील नागरिकांनी सांगितले की, १५ दिवसांपासून आम्ही नोटाटंचाईचा सामना करीत आहोत. एटीएममध्ये पैसे नाहीत.उत्तर प्रदेश : वाराणसीयेथील नागरिकांनी सांगितले की, एटीएम बंद असल्यामुळे लोकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.आंध्र प्रदेश : हैदराबादेतील नोकरदारांनी सांगितले की, शहराच्या अनेक भागांतील एटीएममध्ये पैसे नाहीत.५०० च्या नोटांची पाचपट छपाईमंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव एस. सी. गर्ग यांनी सांगितले. की, एरवी दररोज ५०० रुपयांच्या पाचशे कोटी नोटांची छपाई केली जाते. मात्र, सध्या ही छपाई पाचपटीने वाढविण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत ५०० रुपयांच्या २५०० कोटी नोटा दररोज छापल्या जातील. महिनाभरात छपाईचे हे प्रमाण ७० ते ७५ हजार कोटी नोटांवर जाईल.अर्थमंत्री म्हणतात, बँकांना विचारतोय...देशात पर्याप्त चलनाचा साठा आहे. तरीही काही राज्यांमध्ये निर्माण झालेली चलनटंचाईची समस्या लवकरच सोडविण्यात येईल. नोटांच्या पुरवठ्यासंदर्भात बँकांना आणि रिझर्व्ह बँकेला विचारणा केली जाईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.राहुल गांधी यांनीटिष्ट्वटरवर उडविली खिल्लीसमझो अब नोटबंदी का फरेबआपका पैसा नीरव मोदी की जेबमोदीजी की क्या ‘माल्या’ मायानोटबंदी का आतंक दोबारा छायादेश के एटीएम सब फिर से खालीबैंकों की क्या हालत कर डाली...!
नोटाटंचाई की छुपी नोटाबंदी? दोन हजारांच्या नोटा अनेक राज्यांतून गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 6:08 AM