हैदराबाद - कोरोनाविरोधातील स्वदेशी लस असे कौतुक झालेल्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीला शनिवारी मान्यता मिळाली आहे. मात्र कोव्हॅक्सिनला मिळालेल्या मान्यतेवरून राजकारणालाही सुरुवात झाली आहे. या प्रकाराबाबत भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा एल्ला यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माझा आणि माझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा राजकारणाशी संबंध नाही आहे, असे कृष्णा एल्ला यांनी स्पष्ट केले आहे.ते म्हणाले की, कोव्हॅक्सिनचा मुद्दा आता राजकीय झाला आहे. त्यामुळे मी यावर माझं स्पष्ट मत नोंदवू इच्छितो. माझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा राजकीय पक्षाशी संबंध नाही. काल कोव्हॅक्सिनला मान्यता देण्याची घोषणा डीजीसीएकडून झाल्यानंतर काँग्रेसचे नेते शशी थरूर, तसेच जयराम रमेश यांनी या मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अन्य काही लोकांनीही याबाबतच्या निर्णयावर शंका घेतली होती.
कोव्हॅक्सिनवरून सुरू झालेल्या राजकारणामुळे भारत बायोटेकचे प्रमुख संतापले, नेतेमंडळींना खडेबोल सुनावले
By बाळकृष्ण परब | Published: January 04, 2021 6:11 PM
Corona vaccine Update : कोव्हॅक्सिनला मिळालेल्या मान्यतेवरून राजकारणालाही सुरुवात झाली आहे. या प्रकाराबाबत भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा एल्ला यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देकोव्हॅक्सिनचा मुद्दा आता राजकीय झाला आहे. त्यामुळे मी यावर माझं स्पष्ट मत नोंदवू इच्छितोमाझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा राजकीय पक्षाशी संबंध नाहीआम्ही केवळ भारतातच वैद्यकीय चाचण्या घेतलेल्या नाहीत तर आम्ही यूके सह एकूण १२ देशांमध्ये वैद्यकीय चाचण्या घेतल्या आहेत