शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील
2
"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस
3
“CM एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे”; काँग्रेस नेत्याचा दावा
4
गोळीबार, धमकी आणि आता मित्राची हत्या...; सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार?
5
महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; 'असा' आहे संभाव्य फॉर्म्युला, सपा-शेकापला किती जागा?
6
IND vs NZ: न्यूझीलंडला मोठा धक्का! भारताविरूद्धच्या मालिकेतून वेगवान गोलंदाज OUT
7
“राज ठाकरे स्पष्टवक्ते, आम्ही त्यांच्यात बाळासाहेबांना पाहतो”; शिंदे गटातील नेत्याची भावना
8
90s मधला तो व्हिडिओ ठरला अतुल परचुरेंची शेवटची इन्स्टा पोस्ट, काही दिवसांपूर्वीच केलेला शेअर
9
अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर
10
काँग्रेसकडून भाजपाला धक्का, दोन माजी आमदारांचा कांग्रेसमध्ये प्रवेश
11
७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार
12
Rekha Jhunjhunwala Portfolio: वर्षभरात २८६% रिटर्न, चार दिवसांपासून 'या' शेअरमध्ये मोठी तेजी; तुमच्याकडे आहे का?
13
५ मिनिटं अभिनेत्रीला जबरदस्तीने किस करत राहिला सुपरस्टार; रडत राहिली हिरोईन
14
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
15
PM Internship Scheme : काय आहे PM इंटर्नशिप योजना?, १.५५ लाखाहून अधिक अर्ज; दरमहिना मिळणार ५ हजार रुपये
16
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
17
८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल!
18
Swami Samartha: विकत किंवा भेट मिळालेली स्वामींची मूर्ती घरी स्थापन कशी करावी? वाचा नियम!
19
पाकिस्तानसह 'भारत'ही हरला! न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये; टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर
20
न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून टीम इंडियाची 'कसोटी'; विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडण्याची रोहित शर्माला संधी

विदेशातील खलिस्तानी समर्थकांभोवती फास, केंद्राची भूमिका : ब्रिटनमधून तपशील मागविला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 8:35 AM

Action Against Khalistani Supporters: मोदी सरकारने ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांतील खलिस्तान समर्थक आणि त्यांच्याशी संबंधित लोकांविरुद्ध आपली भूमिका कठोर केली आहे.

- हरीश गुप्ता  नवी दिल्ली : मोदी सरकारने ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांतील खलिस्तान समर्थक आणि त्यांच्याशी संबंधित लोकांविरुद्ध आपली भूमिका कठोर केली आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय परिसरात तोडफोड करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. 

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संबंधित देशातील परराष्ट्र मंत्रालयासमोर हा मुद्दा मांडला आहे. या देशांनी या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आता भारतातील अशा घटकांवर कारवाई करण्यासाठी गृह मंत्रालयानेही कंबर कसली  आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करून इमारतीवरून भारताचा ध्वज खाली उतरवणाऱ्या खलिस्तान समर्थकांवर गुन्हे नोंदविण्याचे निर्देश केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांना दिले आहेत. या घटनेत सहभागी असलेले भारतीय नागरिक आणि ओसीआय कार्डधारकांचे पासपोर्ट रद्द करण्याच्या पर्यायावर गृह मंत्रालय बारकाईने विचार करत आहे. भारताचा ध्वज उतरवणाऱ्यांपैकी बहुसंख्य ब्रिटनचे नागरिक असल्याची माहिती असली, तरी गृह मंत्रालय याबाबतची माहिती एकत्र करत आहे. ब्रिटिश सरकारकडून तपशील मागविण्याचा उद्देश हाच आहे की, ते भारतात आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करता येईल. 

व्हिडिओ क्लिप आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून जवळपास ३०० आंदोलकांना ओळखले गेले आहे. तसेच, सुनक सरकारकडून तपशील मागविला जात आहे. यात गुंतलेल्या लोकांविरुद्ध खटला चालविण्याचा विचार आहे. कारण, त्यापैकी काही भारतीय नागरिक आहेत. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारEnglandइंग्लंड