लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्र आणि मुंबईत लोक पावसाची वाट पाहत असताना संपूर्ण उत्तर भारतातील लोक मात्र उष्णतेची लाट कधी ओसरते, याच्या प्रतिक्षेत आहेत. उत्तर प्रदेशात उष्माघाताने १0 जणांचा बळी घेतला आहे. बिहार, पंजाब, राजस्थान, दिल्ली तसेच ओडिशामध्येही तापमानाचा पारा ४४ अंशांच्या वर गेला असून, काही ठिकाणी तर तो ४८ अंशांवर जाऊ न पोहोचला आहे.उष्णतेच्या लाटेमुळे लोक अक्षरश: होरपळून निघत असून, दुपारी घराबाहेर पडू नका, सोबत पाण्याची बाटली ठेवा, सतत पाणी पीत राहा, मुलांना घराबाहेर पाठवू नका, अशा सूचनाच प्रशासनाने दिल्या आहेत. अर्थात घरी बसले तरी अंगाची लाहीलाही होत असून, उष्णतेमुळे आजारांची शक्यता बळावली आहे. दिल्लीत अधूनमधून पाऊस पडत असला तरी त्यानंतर लगेचच तापमान वाढत असल्याने तिथे आजारांची शक्यता अधिक आहे.उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड भागातील बहराईच जिल्ह्यामध्ये उष्माघाताने ६ मुले मरण पावली अनेक लहान मुले उष्माघातामुळे आजारी पडली आहेत. अवध भागात उष्माघाताने चार बालके मरण पावली आहेत. अनेक मुलांवर उपचार सुरू आहेत. जवळपास संपूर्ण उत्तर प्रदेश कडाक्याच्या उन्हामुळे होरपळून निघाला आहे. उत्तर प्रदेशच्या लखनौ, अलाहाबाद व बांदामध्ये तापमान ४८ अंश नोंदले गेले असून, आग्रा. सुलतानपूर, वाराणसी, झाशी येथे तापमान ४६ अंश आहे. नवी दिल्लीत पालम विमानतळ येथे ४७ व तर आया नगरमध्ये ते ४६.६ इतके होते. पंजाबातील अमृतसर व भटिंडामध्ये ४८ अंश तापमानाची नोंद झाली, तर अन्यत्र ते ४६ अंशांच्या आसपास होते. बिहारमध्ये गया येथे ४६.१ तर हरयाणामध्ये हिसार येथे ४६.६ तर अंबालात ४५ च्या वर तापमान होते. राजस्थानात श्रीगंगानगर, चुरू, कोटा, बिकानेर येथेही ४६ ते ४७ तापमानामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. ओडिशामध्येही उष्णतेची लाट आहे.पंजाब48 नवी दिल्ली47बिहार46.1हरयाणा46.6
उत्तर भारत होरपळला; यूपीत उष्माघाताचे १0 बळी
By admin | Published: June 07, 2017 12:22 AM