पाटणा : गुजरातमध्ये रोजगारासाठी आलेल्या बिहारी कामगारांच्या संरक्षणाची काळजी घ्या आणि त्यांच्यावर हल्ले होऊ देऊ नका, असे आवाहन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना केले. रुपाणी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही फोनवरून चर्चा केली आणि बिहार व उत्तर प्रदेशचे मजूर आता सुरक्षित असल्याचे सांगितले.गुजरातच्या साबरकांठामध्ये एका बिहारी कामगाराने एका लहान मुलीवर अत्याचार केल्यामुळे गुजरातमध्ये संतापाची लाट उसळली असून, स्थानिक लोकांनी सरसकट उत्तर भारतीय लोकांवर हल्ले सुरू केले आहेत. याप्रकरणी ४३१ हून अधिक लोकांना पोलिसांनी अटक केली आहे, तसेच याप्रकरणी ५६ गुन्हे दाखल केले आहेत. तरीही या हल्ल्यांमुळे घाबरून सुमारे ५0 हजार बिहारी व उत्तर प्रदेशातील कामगार गुजरातमधून आपापल्या गावी पळून चालले आहेत.
उत्तर भारतीयांचे पलायन; नितीशकुमार म्हणाले, बिहारींना संरक्षण द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 2:41 AM