शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Noru Cyclone: नोरू चक्रीवादळ घोंगावणार; महाराष्ट्रासह देशातील २० राज्यांना येलो अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 11:31 AM

नोरू चक्रीवादळामुळे देशातील काही राज्यांमध्ये मान्सून अजूनही सुरू असून त्याच्या परतीला विलंब होत आहे.

नवी दिल्ली - देशातील अनेक राज्यांमध्ये दसऱ्याच्या दिवशी हलका पाऊस झाला. त्यामुळे दुर्गा विसर्जन आणि रावण दहन कार्यक्रमात अडथळा आला. चीन समुद्रातील नोरू चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्री वारे वाहत आहेत, त्यामुळे आर्द्रता वाढल्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

नोरू चक्रीवादळामुळे देशातील काही राज्यांमध्ये मान्सून अजूनही सुरू असून त्याच्या परतीला विलंब होत आहे. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळाचे केंद्र बनलं आहे. पावसामुळे रब्बी पेरणीच्या सुरुवातीच्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, तर भाजीपाला आणि फुलांच्या लागवडीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पुढील एक आठवडा दिल्ली एनसीआरमध्ये ढगाळ आकाश आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, सिक्कीमसह देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून १३ ऑक्टोबरपर्यंत परतेल.

उत्तर प्रदेश, उत्तराखंडसाठी अलर्टहवामान खात्यानुसार, पुढील काही दिवस उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात पाऊस पडेल. विभागाने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ७-८ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील कुमाऊं आणि गढवाल भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात पुढील दोन ते तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशमध्ये काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

२० राज्यांसाठी यलो अलर्टहवामान खात्याने देशातील २० राज्यांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच या राज्यात मेघगर्जनेसह आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ही राज्ये आहेत – उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rainपाऊस