नवी दिल्ली : नोटाबंदी व जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेस आलेली मंदी हा वादाचा विषय ठरला असला, तरी पर्यावरणाच्या दृष्टीने बहुधा ती इष्टापत्ती ठरेल. तापमानवाढीस कारणीभूत ठरणा-या ‘ग्रीन हाउस गॅसेस’च्या भारतातून झालेल्या उत्सर्जनात २०१७मध्ये गेल्या दशकातील सरासरीच्या तुलनेत झालेली घट हे त्याचे कारण आहे.‘ग्रीन हाउस गॅसेस’च्या जागतिक उत्सर्जनाचा लेखाजोखा घेणारा ‘२०१७ दि ग्लोबल कार्बन बजेट रिपोर्ट’ अहवाल सोमवारी वैज्ञानिक नियतकालिकांत प्रसिद्ध झाला. त्यानुसार, गेली तीन वर्षे जागतिक पातळीवर ‘ग्रीन हाउस गॅसेस’च्या उत्सर्जनामधील शून्यावर राहिलेली वाढ या वर्षअखेर पुन्हा दोन टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे. अहवाल म्हणतो की, भारतात सौरऊर्जेची स्थापित क्षमता दुपटीने वाढून १२ गिगॅवॅटवर पोहोचली असली, तरी यंदा ‘ग्रीन हाउस गॅसेस’मध्ये वाढ कमी होण्यास इतरही कारणे असावीत.
नोटाबंदी, जीएसटी ठरणार इष्टापत्ती! पर्यावरणास उपकारक; ‘ग्रीन हाउस गॅसेस’च्या उत्सर्जनात मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:16 AM