नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला कडवे आव्हान देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विरोधी एकजुटीच्या प्रयत्नात आता १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरुत विरोधी पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीला २४ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे.
२३ जून रोजी पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत १५ राजकीय पक्ष सहभागी झाले होते. त्या तुलनेत यावेळी आणखी नऊ राजकीय पक्षही विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.
‘आप’लाही निमंत्रणविरोधकांच्या बैठकीला आम आदमी पक्षालाही निमंत्रित करण्यात आले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी अशी आशा व्यक्त केली की, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी बंगळुरु येथील विरोधी पक्षांच्या बैठकीत उपस्थित राहतील.
...त्यांचे १५० लोकसभा सदस्यबैठकीला एमडीएमके, केडीएमके, व्हीसीके, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी), फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) आणि केरळ काँग्रेस (मणि) देखील उपस्थित राहणार आहेत. ज्या २४ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत त्यांचे जवळपास १५० लोकसभा सदस्य आहेत.