शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

६५ कोटी कसले? ५० कोटीच वटवले- राष्ट्रवादी काँग्रेस; प्रसंगी कोर्टात जाण्याचीही ठेवली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 11:12 AM

राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक रोख्यांद्वारे एकूण ६५.६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असल्याची आकडेवारी सादर

मुंबई: २०१८ ते जानेवारी २०२४ या कालावधीत निवडणूक रोखे योजना सुरू झाल्यापासून गेल्यावर्षी फूट पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक रोख्यांद्वारे एकूण ६५.६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस) जयंत पाटील यांनी सांगितले की, पक्षाला रोख्यांमधून ५०.५ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.  २०१९ पर्यंत आम्हाला ३१ कोटी, तर नंतर २० कोटी असे एकूण ५०.५ कोटी रुपये मिळाले आहेत. यातील बहुतेक निधी २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी वापरण्यात आला.

शरद पवार गट म्हणतो...

खाते गोठवल्यानंतर फक्त ७ लाख रुपये शिल्लक असल्याचे मला सांगण्यात आले. ६६ कोटी रुपये कोठून आले याची माहिती नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊ. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना सर्व व्यवहार झाले. जुलै २०२३ मध्ये पक्ष फुटल्यानंतर अजित पवार गटाने एसबीआयला दिलेल्या पत्राच्या आधारे खाते गोठवण्यात आले. आम्ही स्वतंत्र खाते काढल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

कंपन्या कोणत्या शहरातील?

बऱ्याच कंपन्या पुण्यातील आहेत. निओटिया फाउंडेशन, भारती एअरटेल, सायरस पूनावाला, युनायटेड शिपर्स, वादग्रस्त बिल्डर अविनाश भोसले (त्यांची सध्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे), बजाज फिनसर्व्ह, अतुल चोरडिया, युनायटेड फॉस्फरस, ओबेरॉय रियल्टी आणि अभय फिरोडिया यांचा समावेश आहे.

काय म्हणणे?

फूट पडण्यापूर्वी सर्व व्यवहार झाले आहेत. आमच्या पक्षाला निवडणूक रोख्यांमधून निधी मिळालेला नाही. आम्ही हितचिंतकांकडून निधी गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रमुख ५ देणगीदार

  • क्यूक सप्लाय चैन        १० कोटी
  • राहुल भाटिया        ३.८ कोटी
  • टोरेंट पॉवर        ३.५ कोटी
  • मगरपट्टा टाउनशिप डेव्हलपमेंट ॲण्ड कन्स्ट्रक्शन      ३ कोटी
  • महालक्ष्मी विद्युत    २.५ कोटी

 

  • ‘नवयुग’ची भाजपला ५५ काेटींची देणगी

- उत्तराखंडमध्ये सिल्क्यारा बाेगद्यात गेल्यावर्षी नाेव्हेंबर महिन्यात ४१ कामगार अडकले हाेते. या बाेगद्याचे काम करणाऱ्या नवयुग इंजिनिअरिंग कंपनीने ५५ काेटी रुपयांचे निवडणूक राेखे खरेदी केले हाेते.- हे सर्व राेखे भाजपला दान करण्यात आले हाेते. कंपनीने १९ एप्रिल २०१९ ते १० ऑक्टाेबर २०२२ या कालावधीत हे राेखे खरेदी केले हाेते. ही कंपनी नवयुग समूहाची उपकंपनी आहे.- एकूण देणग्यांपैकी ८५ टक्के देणग्या फक्त टॉप ३ देणगीदारांनी दिल्या. भाजपला एकाच देणगीदाराकडून ५८४ कोटी रुपये मिळाले, तृणमूल काँग्रेस ५४२ कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार