शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

भाजपा आणि काँग्रेसचा नव्हे, मी तर तेलंगणाचा एजंट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 5:26 AM

जनतेसाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे. भाजपा किंवा काँग्रेसचा मी एजंट कधीच नव्हतो आणि नाही, मी केवळ तेलंगणाच्या जनतेचा एजंट आहे.

- धनाजी कांबळेहैदराबाद : जनतेसाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे. भाजपा किंवा काँग्रेसचा मी एजंट कधीच नव्हतो आणि नाही, मी केवळ तेलंगणाच्या जनतेचा एजंट आहे. विकासालाच माझे प्राधान्य आहे, असे टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केसीआर हे भाजपचे एजंट असल्याचा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केसीआर हे काँग्रेसचे एजंट असल्याचा आरोप केला होता.त्या आरोपांना उत्तर देताना चंद्रशेखर राव यांनी भाजप व काँग्रेसचा समाचार घेतला. सूर्यापेठमधील कोडद येथे प्रचारादरम्यान ते बोलत होते. आम्ही केवळ तेलंगणाच्या विकासाचा विचार करतो. त्यामुळेच येथील शेतकऱ्यांना आम्ही २४ तास मोफत वीज देतो. भाजपाची जर १९ राज्यांमध्ये सत्ता आहे, तर त्यांना असे का जमत नाही? केवळ वल्गना करण्यात आणि फुशारकी मारण्यात तरबेज असलेल्या भाजपा नेत्यांकडून कोणतीच अपेक्षा करता येत नाही. ते शेतकरी विरोधी आहेत, अशी टीका त्यांनी केली.हीच अवस्था काँग्रेसचीही आहे. त्यामुळे तेलंगणातील जनता विकासालाच साथ देईल, आणि त्याचे प्रतिबिंब ११ डिसेंबरला सगळ््यांनाच दिसेल, असा विश्वासही केसीआर यांनी व्यक्त केला. भाजपाकडे पुन्हा मतदारांपर्यंत जाण्यासाठी कोणताच विकासाचा मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेसमोर जाण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा राजकीय पटलावर आणला जात आहे, असे केसीआर म्हणाले. तर टीआरएसचे दुसरे नेते राम प्रसाद यांनीही योगी सरकारवर टीकास्र सोडले. उत्तर प्रदेशातील जनता भाजपवर प्रचंड नाराज असून, यांना सत्तेवर बसवून आम्ही चूक केली, अशी येथील प्रत्येकाची भावना आहे, असे राम प्रसाद म्हणाले.काँग्रेसची वॉर रुमकेसीआर यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने सोशल मीडिया टीम तयार केली आहे. फेसबुक, ट्विटर, इंन्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपवरून मतदारांपर्यंत पोचण्याची मोहीम सुरु केली आहे. जवळपास ६ हजार ग्रुपमधून दररोज दीड लाख लोकांपर्यंत पोहोचून प्रचार केला जात आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवून आपली भूमिका मांडली जात आहे. हैदराबादमध्ये याचे मध्यवर्ती कार्यालय स्थापन केले आहे. काँग्रेसचे ५५ निष्ठावान कार्यकर्ते या टीममध्ये आहेत. मदनमोहन राव हे या वॉर रुमचे प्रमुख आहेत. भाजपने देशभर जी स्ट्रॅटेजी वापरली, तीच स्ट्रॅटेजी तेलंगणात वापरली जात आहे. याच सोशल मीडिया टीमने काँग्रेसच्या नेत्या व यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हिंदीतील भाषणाचा व्हिडिओ तयार करून, तो राज्यातील मतदारांपर्यंत सोशल मीडियामार्फत पाठवला आहे.>योगी अंगठा छाप; अकबरुद्दीन ओवेसी यांनी घेतला खरपूस समाचारतेलंगणात सत्ता आल्यास ओवेसींना निजामांसारखे पळवून लावू, असे म्हणणाºया योगी आदित्यनाथ यांचा अकबरुद्दीन ओवेसी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. योगी तु्म्ही अंगठा छाप आहात, जर सुशिक्षित असता तर तुम्हाला माहीत असते की निजाम पळून गेले नव्हते. ही भाषा योगींची नाही तर मोदींची आहे, असा प्रतिहल्ला ओवेसींनी चढवला.निजाम पळून गेले होते, या योगींच्या या वक्तव्यावर ओवेसी म्हणाले की, ‘योगी तुम्ही अंगठा छाप आहात. तुमचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे.तुम्ही सुशिक्षित असता तर तुम्हाला माहीत असते, की निजाम सोडून पळाले नव्हते. तर त्यांना भारत सरकारने राज्यपाल केले होते. जेव्हा चीनशी युद्ध झाले, त्यावेळी निजामांनी देशाला सोने दान केले होते. त्याबद्दल भारत सरकारने नंतर त्यांचे कौतुकही केले होते. पण तुम्ही म्हणता निजाम पळून गेले होते. ही तुमची नव्हे, तर मोदींची भाषा आहे.’

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018