ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - डोकलाम प्रकरणामुळे भारत आणि चीनमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद आज संसदेतही उमटले. समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांनी लोकसभेत चीनसोबतच्या तणावाचा प्रश्न आक्रमकतेने मांडला. भारताचा सर्वात मोठा शत्रू हा पाकिस्तान नसून चीन आहे, हे मुलायम सिंह यांनी ठळकपणे लोकसभेसमोर मांडले.
चीनच्या कुरापतींबाबत मुलायम सिंह यादव म्हणाले, "चीन सिक्किम आणि भूतानवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या देशाने भारतावर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली आहे." यावेळी तिबेटबाबत बोटचेपी भूमिका घेण्याच्या तत्कालीन सरकारच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. कोणत्याही परिस्थिती तिबेट चीनच्या ताब्यात देता कामा नये होते. तीबेच चीनच्या ताब्यात देऊन मोठी चूक केली गेली. आता भारताने तिबेटच्या स्वातंत्र्याचे आक्रमकपणे समर्थन केले पाहिजे. तसेच त्यासाठी दलाई लामा यांची सर्वतोपरी मदतही केली पाहिजे."अधिक वाचा
( धर्म सोडा किंवा शिक्षा भोगा! चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा सदस्यांना इशारा )(भारत बनू शकतो मोठी महासत्ता, चीनी प्रसारमाध्यमांचे भाकीत )(चीन, पाकिस्तानसोबत लढण्यासाठी लागतील तब्बल 27 लाख कोटी : लष्कर )आता चीन पाकिस्तानला मदत करत आहे. तसेच तिबेटच्या सीमेवर युद्धसराव करण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे. चीनने सीमेवर सुरू केलेल्या कारवाया पाहता भूतान आणि सिक्कीमचे संरक्षण करणे ही भारताची जबाबदारी असल्याचेही मुलायम यांनी सांगितले.
दरम्यान, काश्मीरमधील अशांततेस पाकिस्तानबरोबरच चीनही कारणीभूत आहे, असा आरोप काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी नुकताच केला होता. मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी चीनही काश्मीरमध्ये गडबड करीत असल्याचे सांगितले.