थोडेथोडके नाहीत, 30 काँग्रेसचे आणि काही अपक्ष आमदार सचिन पायलटांच्या गटात; आमदारकी वाचणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 08:59 PM2020-07-12T20:59:11+5:302020-07-12T21:09:00+5:30

Rajasthan political crisis: पायलट जो निर्णय घेतील त्यांना आपला पाठिंबा असल्याचे या आमदारांनी कळविले आहे. यामुळे गेहलोत सरकारवर टांगती तलवार असून काही वेळातच राजस्थानमध्ये आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. 

Not a few, in the group of 30 Congress and some independent MLAs Sachin Pilot | थोडेथोडके नाहीत, 30 काँग्रेसचे आणि काही अपक्ष आमदार सचिन पायलटांच्या गटात; आमदारकी वाचणार?

थोडेथोडके नाहीत, 30 काँग्रेसचे आणि काही अपक्ष आमदार सचिन पायलटांच्या गटात; आमदारकी वाचणार?

googlenewsNext

जयपूर : राजस्थानमध्येकाँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री सचिन पायलटांच्या गोटात थोडेथोडके नाही तर 30 काँग्रेसचे आमदार आणि काही अपक्ष आमदार आहेत. यामुळे जर पायलट काँग्रेसमधून बाहेर पडल्यास नियमाप्रमाणे कोणाच्याही आमदारकीला धक्का लागणार नसल्याची चिन्हे आहेत. (Rajasthan political crisis)


सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या गटामध्ये काँग्रेसचे 30 आमदार आणि अन्य काही अपक्ष आमदार असल्याचे खात्रलायक वृत्त एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. पायलट जो निर्णय घेतील त्यांना आपला पाठिंबा असल्याचे या आमदारांनी कळविले आहे. यामुळे गेहलोत सरकारवर टांगती तलवार असून काही वेळातच राजस्थानमध्ये आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. 


काय परिस्थिती?
राजस्थान विधानसभेमध्ये काँग्रेसला 107 जागांवर बहुमत आहे. याशिवाय 13 अपक्ष आणि एक राष्ट्रीय लोकदलाचे आमदारांचे समर्थन आहे. यामुळे गेहलोत सरकारकडे 121 आमदारांचे समर्थन आहे. तर भाजपाकडे 72 आमदार असून बहुमतासाठी 29 आमदारांची गरज आहे. विधानसभेत बहुमतासाठी 101 मते हवी आहेत. जर पायलट 30 पेक्षा जास्त आमदार फोडण्यात यशस्वी झाले तर त्यांना 1/3 आमदार गोळा करण्यासाठी काहीच काँग्रेसच्या आमदारांची गरज भासणार आहे. काही आमदार तळ्यात मळ्यात आहेत. यामुळे जर हा आकडा गाठल्यास कर्नाटक, मध्य प्रदेशप्रमाणे आमदारकी गमवावी लागणार नाही. 

ज्योतिरादित्य शिंदे मदतीला?

कर्नाटक, मध्य प्रदेशनंतर काँग्रेसच्या ताब्यातून आणखी एक मोठे राज्य जाण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan political crisis) शनिवारपासून मोठी उलथापालथ सुरु झाली असून उप मुख्यमंत्री सचिन पायलट हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. नाराज असलेल्या पायलटांना त्यांचे काही महिन्यांपूर्वीच भाजपात गेलेले मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांचे पाठबळ मिळाले आहे. शिंदे यांनी पायलट यांचे उघडपणे समर्थन केले आहे. यामुळे राजस्थानमध्येही सत्तापालट अटळ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी पूर्वाश्रमीचे मित्र सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ ट्विट करत काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. ''माझे जुने साथीदार राहिलेल्या सचिन पायलट यांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून डावलले जात आहे. हे पाहून मी दु:खी आहे. यावरून काँग्रेसमध्ये प्रतिभावान आणि ताकदवान नेत्यांना जागा नसल्याचे स्पष्ट होत आहे., असे ट्विट केले आहे. महत्वाचे म्हणजे ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस, सचिन पायलट आणि गेहलोत यांना टॅग केले आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

Rajasthan political crisis: पक्ष सुटला पण दोस्ती कायम; काँग्रेसविरोधात सचिन पायलटांना ज्योतिरादित्यांच थेट 'बळ'

हार्दिक पटेलांनी गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होताच उत्साहात ट्विट केले; ट्रोल झाले

गेहलोत सरकारची रात्री लिटमस टेस्ट; तातडीची बैठक, दोन डझन आमदार पायलटांकडे

कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे

Rajasthan political crisis: आमदारांनो! लवकर जयपूर गाठा, ज्याचा फोन बंद येईल...; गेहलोतांचे आदेश

मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार

Web Title: Not a few, in the group of 30 Congress and some independent MLAs Sachin Pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.