शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

देवेगौडांचे पुत्र म्हणतात, कर्नाटकमध्ये किंगमेकर नव्हे, किंग बनणार   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 6:46 PM

मतदानपूर्व कलचाचण्यांमधून कर्नाटक विधानसभेचा निकाल त्रिशंकू लागून, देवेगौडांचा जनता दल सेक्युलर पक्ष किंगमेकर बनेल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र देवेगौडांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांनी आगामी निवडणुकीत

बंगळुरू - अवघ्या पंधरवड्यावर आलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस, भाजपा आणि जनता दल (सेक्युलर) हे पक्ष कंबर कसून तयार झाले आहेत. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तशी चुरसही वाढत चालली आहे. मतदानपूर्व कलचाचण्यांमधून कर्नाटक विधानसभेचा निकाल त्रिशंकू लागून, देवेगौडांचा जनता दल सेक्युलर पक्ष किंगमेकर बनेल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र देवेगौडांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांनी आगामी निवडणुकीत त्यांचा पक्ष किंगमेकर नाही तर किंग बनेल, असा दावा केला आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना कुमारस्वामी म्हणाले, "कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर पक्ष पूर्ण बहुमतासह विजयी होईल असा मला संपूर्ण विश्वास आहे. आमच्या पक्षाला बहुमत मिळेल याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाही.  काँग्रेस, भाजपा आणि जनता दल धर्मनिरपेक्ष या तीन प्रमुख पक्षांमध्ये कर्नाटक विधानसभेची  खरी लढत आहे. ओपिनियन पोलने दाखवलेल्या अंदाजामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यापैकी कोणालाही पूर्ण बहुमत मिळेल असा थेट कौल मिळालेला नाही. तर येणारी विधानसभा त्रिशंकू असेल असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र सर्व ओपिनियन पोलमधून माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाला किंगमेकर होण्याची संधी चालून येत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र देवेगौडांचे पुत्र असलेल्या कुमारस्वामींना ओपिनियन पोलमधील आकडे मान्य नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार " बहुमतासाठीच्या 113 जागा जिंकणे हे आमचे प्रमुख लक्ष्य आहे. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. अखेरीस आम्ही आम चे लक्ष गाठू याचा मला विश्वास आहे. माझ्या सध्याच्या अंदाजानुसार आमचा पक्ष  97 ते 105 जागांवर सहजपणे विजयी होईल. त्यामुळे उर्वरित जागा जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."कर्नाटक विधानसभेची यंदाची निवडणूक जनता दल सेक्युलर पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असल्याचे ते मान्य करतात. ''गेल्या दहा वर्षांपासून आम्ही सत्तेतून बाहेर आहोत, त्यामुळे आमच्यासाठी ही नक्कीच अस्तित्वाची लढाई आहे. पण आम्हाला स्वार्थासाठी सत्ता नको. गेल्या दहा वर्षांत भाजपा आणि काँग्रेसने इथे अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे."असे कुमारस्वामी म्हणाले.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)congressकाँग्रेसBJPभाजपा