महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा नेहमी सोशल मीडियावर नवनवीन आयडिया देणारे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या ट्विट्सही प्रचंड व्हायरल होतात. पण, शनिवारी आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटनं सर्वांना विचार करण्यास भाग पाडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर #JusticeforJayarajAndFenix हा ट्रेंड सुरू आहे. या एका घटनेनं तामिळनाडूतील वातावरण प्रचंड तापले आहे. दाक्षिणात्य कलाकार सोशल मीडियावर जाहीर निषेध करताना दिसत आहेत आणि टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन यानंही रोष व्यक्त केला. 'हा माझा भारत नाही,' अशा आशयाचे ट्विट करून आनंद महिंद्या यांनी त्या घटनेकडे सर्वांचे लक्ष वेधले.
नेमकं काय घडलं?तामिळनाडूमध्ये 19 जूनला पी. जयराज ( 59) आणि त्यांचा मुलगा फेनिक्स ( 31) यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये दिलेल्या वेळेपेक्षा अधिककाळ जयराज आणि फेनिक्स यांनी त्यांचं मोबाईलचं दुकान सुरू ठेवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी त्यांना अटक केली आणि पोलिस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या दोघांना बेदम मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. जयराज व फेनिक्स यांचे मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. त्यांनी पोलिसांवर हत्येचा गुन्हा नोंदवला जावा, अशी मागणी केली आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार्सही या मोहिमेत उतरले आहेत. अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर हिनंही त्या पिता-पुत्राला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. जयराज व फेनिक्स यांना नग्न करून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या शरिरातून प्रचंड रक्त वाहिले होते, असा दावा अनेकांनी केला आहे.
MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट
पाकिस्तानात चाललंय काय? मोहम्मद हाफिजचा कोरोना रिपोर्ट 72 तासांत पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-पॉझिटिव्ह
अजिंक्य रहाणेकडून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला...
1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही