नवी दिल्ली : लडाखमध्ये चीन युद्ध करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. यामुळे भारताने अरुणाचलप्रदेशसह एलएसीवरील भागात सैन्य कुमक वाढविण्यास सुरुवात केली असून सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी मोठा इशारा दिला आहे.
जर चीनने भारतावर हल्ला केला तर त्याचा गैरफायदा पाकिस्तानकडूनही घेतला जाण्याची शक्यता रावत यांनी वर्तविली आहे. (Threat of China-Pak calibrated action against India) यासाठी भारतीय सैन्याला तयार रहावे लागणार आहे. चीन आणि पाकिस्तानमधील पीओके क्षेत्रातील सहकार्याच्या घडामोडींवर आपल्याला लक्ष ठेवावे लागणार आहे. दोन्ही बाजुंनी हल्ला होण्याची शक्यता असून चीनच्या काही आक्रमक हालचाली जाणवू लागल्याचे रावत यांनी सांगितले.
भारत आणि अमेरिकेमधील तिसरी रणनीती सहकार्य फोरमध्ये बोलताना त्यांनी हा धोक्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानने आपल्याविरोधात एकप्रकारचे युद्धच छेडले आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसविण्यासह भारताच्या वेगवेगळ्या भागात दहशतवाद पसरविण्याचे काम करत आहे. आता पाकिस्तान उत्तरेकडील सीमेवरही संकटे आणू पाहत आहे. असे केल्यास त्याचे मोठे नुकसान पाकिस्तानला झेलावे लागणार आहे, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला.
भारताला पूर्व आणि पश्चिमेकडून दोन्ही बाजुने एकाचवेळी हल्ला होण्याचा धोका सांगताना रावत यांनी यावर तयारी करण्याचा विचार सुरु असल्याचे म्हटले आहे. भारतीय सैन्य दले या दोन्ही संकटांना तोंड देण्यासाठी तयार राहणार आहेत. भविष्यासाठी ही तयारी करावी लागणार आहे, असे ते म्हणाले.
आम्हाला एलएसीवर शांतता हवी आहे. मात्र, चीन आक्रमक पद्धतीने हालचाली करत असून आम्हीही त्याला चोख प्रत्यूत्तर देण्याची ताकद ठेवून आहोत. अमेरिकेने भारताला अपाचे हेलिकॉप्टर, चिनूक सारखे हेलिकॉप्टर दिले आहेत. हे सैन्य सामुग्री सहकार्य पुढेही सुरुच राहिल असे रावत म्हणाले.
EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको'
महाराष्ट्राच्या 23 अधिकाऱ्यांना IAS म्हणून पदोन्नती; पाहा संपूर्ण यादी
'पुन्हा खोटे गुन्हे दाखल केल्यास...'; मनसेच्या अविनाश जाधवांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा
मोठी दुर्घटना! 5800 गायी घेऊन जाणारे जहाज बुडाले; 43 कर्मचाऱ्यांपैकी 1 जण वाचला