शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

पंतप्रधानपदाची बिलकूल इर्ष्या नाही, संघाचीही तशी योजना नाही - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 5:00 AM

'मी स्वप्ने पाहात नाही, लॉबिंगही करत नाही'

नवी दिल्ली : पंतप्रधान होण्याची मला बिलकूल इर्ष्या नाही वा पंतप्रधानपदासाठी प्रसंगी माझे नाव पुढे करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कोणतीही योजना नाही, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते व वरिष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नि:संदिग्धपणे स्पष्ट केले.आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर पंतप्रधानपदासाठी पक्षातर्फे आपले नाव पुढे केले जाऊ शकते, या राजकीय वर्तुळातील अटकळींना गडकरी यांनी ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पूर्णविराम दिला. मी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही, असे ठामपणे सांगत ते म्हणाले की, अथक काम करत राहणे हाच माझा मंत्र आहे. मी किंवा रा. स्व. संघ यांच्यासाठी देश सर्वोच्च आहे. त्यामुळे पंतप्रधानपद माझ्या मनात नाही किंवा संघाचाही तसा कोणताही विचार नाही. ‘मै त चला जिधर चले रस्ता. जो काम दिखा, करता गया’, हा माझा स्वभाव आहे, असे सांगून गडकरी पुढे म्हणाले,राजकारणात किंवा काम करताना मी कधी गणिते मांडली नाहीत किंवा उद्दिष्टे ठरविली नाहीत. मी स्वप्ने पाहात नाही. मी कोणाकडे (काही मागायला) जात नाही किंवा कोणतेही लॉबिंग करत नाही. मी या स्पर्धेत (पंतप्रधानपदाच्या) नाही मी मनापासून सांगत आहे.लोक काय विचार करतात ते मला माहित नाही. पण ते जो विचार करतात त्याच्याशी माझा दुरान्वयानेही संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले. मोदीजी उत्तम काम करत आहेत व मी स्वत: आणि आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आमच्या सरकारने केलेले काम पाहता यावेळी मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला (रालोआ) गेल्या निवडणुकीपेक्षा नक्की जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करून ‘महागठबंधन’च्या नावाने एकत्र येण्याचे विरोधकांचे प्रयत्न ही ‘महामिलावट’ आहे, असा टोला त्यांनी लगावला. पंतप्रधानपदाच्या स्पर्षेत असण्याविषयीच्या अटकळींना गेल्या महिन्यात गडकरींनी‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, असे संबोधले होते. विरोधकांमध्येही ते लोकप्रिय आहेत, असे म्हटल्यावर गडकरी म्हणाले होते की, माझ्याकडे जो कोणी येतो त्याला मी होता होई तो मदत करत असतो!या कारकिर्दीत काही कामे पूर्ण न झाल्याची मला खंत नाही. सतत काम करत राहणे हे माझे तत्त्व आहे. जे काही करता येण्यासारखे होते तेवढे मी केले. कोणीही परिपूर्ण नसतो व तसे कोणी मानूही नये. प्रत्येकाने सतत काम करत राहावे.-नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीprime ministerपंतप्रधान