नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस वगळता भाजप विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून शरद पवार मिशन २०२४ साठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी करत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र आता याबद्दल राष्ट्रमंचाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूलचे नेते यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंचची स्थापना केली आहे. याच राष्ट्रमंचच्या माध्यमातून शरद पवारांच्या निवासस्थानी दिल्लीत भाजप विरोधी पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली असताना राष्ट्रमंचाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 'लोकसभेच्या २०२४ मध्ये होत असलेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपला आव्हान देण्याच्या हेतूनं तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी ही बैठक होत नाहीए,' असं स्पष्टीकरण राष्ट्रमंचाकडून देण्यात आलं आहे.प्रशांत किशोर यांनी काढली तिसऱ्या आघाडीची हवा? शरद पवारांच्या 'पॉवरफुल' बैठकीआधी म्हणाले...
शरद पवारांच्या निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दलाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला वरिष्ठ वकील के. टी. एस. तुलसी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, माजी राजदूत के. सी. सिंह, गीतकार जावेद अख्तर, वरिष्ठ पत्रकार करण थापर, आशुतोष उपस्थित राहणार आहेत.
शरद पवारांच्या बैठकीआधी काय म्हणाले प्रशांत किशोर?प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात काल दिल्लीत तीन तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. गेल्या दोन आठवड्यातील ही दुसरी बैठक होती. लोकसभेच्या पुढील निवडणुकीसाटी पवार तिसरी आघाडी तयार आहेत का, अशी चर्चा या बैठकीनंतर जोर धरू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर एक अतिशय महत्त्वाचं विधान केलं आहे. 'माझा तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास नाही. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देईल यावर माझा विश्वास नाही,' असं किशोर यांनी म्हटलं आहे.