शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

ATM मधून लवकरच येणार 20 आणि 50 च्या नोटा

By admin | Published: November 14, 2016 10:48 PM

स्टेट बँक ऑफ इंडियासह इतरही बँकांच्या एटीएममधून लवकरच 20 आणि 50 रुपयांच्या नोटा येणार आहेत

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून लवकरच 20 आणि 50 रुपयांच्या नोटा येणार आहेत, अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यानंतर 100 रुपयांच्या नोटा एटीएममधून उपलब्ध करून दिल्या जात आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने बँकांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आहे. त्यानंतर आता एक पाऊल पुढे टाकत ग्राहकांच्या सुविधेसाठी 20 आणि 50 रुपयांच्या नोटाही एटीएममध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली.सर्वप्रथम या नोटा एसबीआयच्या एटीएममध्ये उपलब्ध होणार असून, त्यानंतर 20 आणि 50 च्या नोटा इतर बँकांच्याही एटीएममधून मिळू लागल्यास लोकांना दैनंदिन व्यवहार करणं फायदेशीर ठरणार आहे, असंही अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या आहेत. त्यामुळे एसबीआय एटीएममध्ये 20 आणि 50 च्या नोटा कधी उपलब्ध करते, ग्राहकांमध्ये याची प्रचंड उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे. तसेच 20 आणि 50च्या नोटा उपलब्ध झाल्यास पहिल्यांदाच 100 रुपयांखालील रकमेच्या नोटा एटीएममधून बाहेर येणार आहेत.दरम्यान, काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानं त्याची फारच चर्चा झाली. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नोटांसंदर्भात देशभरात गोंधळ होता. मात्र अरुंधती भट्टाचार्य यांच्या या वक्तव्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.