नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने २०० रुपयांची नोट आठवडाभरापूर्वी चलनात आणली असली तरी एटीएमवर ती उपलब्ध व्हायला आणखी तीन महिने तरी लागतील. ही नोट एटीएममधून उपलब्ध करून देण्यासाठी या यंत्रांची मोठ्या प्रमाणावर फेररचना (रिकॅलिब्रेशन)करावी लागणार आहे. काही बँकांनी एटीएम कंपन्यांना या नव्या नोटेची चाचणी घेण्यास सांगितले असले तरी त्यांना २०० च्या नोटाच उपलब्ध झालेल्या नाहीत.रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात निश्चित कालावधीचा उल्लेख न करता २०० रुपयांच्या नोटांचा पुरवठा लवकरच केला जाईल, असे म्हटले.एटीएम यंत्रांत २०० रुपयांच्या नोटेसाठी बदल करून घेण्यास रिझर्व्ह बँकेकडून आम्हाला अजून आदेश आलेला नाही, असे एटीएम उत्पादक कंपन्यांनी म्हटले. बँकेकडून आम्हाला आदेश मिळाला की आम्ही यंत्रांत तसा बदल करून घेऊ, असे एजीएस ट्रॅन्झॅक्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेडचेअध्यक्ष आर. बी. गोयल यांनी सांगितले. एजीएसने देशभर ६० हजार एटीएम बसवले आहेत.तांत्रिक बदलासाठी ९० दिवसांची गरज सध्याच्या नोटांपेक्षा २०० रुपयांच्या नोटेचा आकार वेगळा आहे. ही नवी नोट आम्हाला मिळाली कीत्यानुसार एटीएमच्या कॅसेटमध्ये बदल केले जातील. हा तांत्रिक बदल करून घेण्यासाठी ९० दिवस लागतील. हा बदल घडवतानाही या यंत्रातून १००,५०० आणि दोन हजार रुपयांची नोट मिळेल, असे गोयल म्हणाले. देशभर २.२५ लाख एटीएम कार्यरत आहेत.
एटीएममध्ये 200 ची नोट 3 महिन्यांनी, रिकॅलिब्रेशनचा व्याप, चाचणीसाठी नोटा उपलब्ध नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 4:48 AM