नोट फॉर वोट! काँग्रेस नेत्याकडून 5 लाख रुपयांत गावच खरेदी करण्याचा प्रताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 06:41 PM2018-10-29T18:41:02+5:302018-10-29T18:44:11+5:30

काँग्रेस नेते संपत कुमार यांनी 5 लाख रुपयांत पूर्ण गावचं विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील सर्वच मतदारांची मते घेण्यासाठी

Note for vote! Congress leader trying to buy village for Rs 5 lakh | नोट फॉर वोट! काँग्रेस नेत्याकडून 5 लाख रुपयांत गावच खरेदी करण्याचा प्रताप 

नोट फॉर वोट! काँग्रेस नेत्याकडून 5 लाख रुपयांत गावच खरेदी करण्याचा प्रताप 

Next

हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने आपले उमेदवार मैदानात उतरविण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर, उमेदवारांकडूनही निवडणूक प्रचाराला आणि मतदारांना आपलसं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते संपत कुमार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत संपत कुमार यांच्याकडून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जाते आहे. 

काँग्रेस नेते संपत कुमार यांनी 5 लाख रुपयांत पूर्ण गावचं विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील सर्वच मतदारांची मते घेण्यासाठी संपत कुमार यांनी 5 लाख रुपये देऊ केल्याचं या व्हिडीओत म्हटले आहे. एका ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर, याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जोगुलंबा गद्वाल जिल्ह्यात ही घटना उघडकीस आली आहे.

या व्हिडीओत संपत कुमार एका व्यक्तीशी संवाद साधत आहेत. त्यामध्ये, शंकापुरम गावातील एका नेत्याशी बोलताना संपूर्ण गावाचे मतदान विकत घेण्याची डील संपत कुमार यांच्याकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, 5 लाख रुपये देऊन या गावातील सर्वच मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे या व्हिडीओतून दिसून येते. कारण, जर पूर्ण गाव काँग्रेसला मतदान करण्यास तयार असेल, तर आम्ही 5 लाख देऊ. त्यापैकी 1.5 लाक रुपये रोख तर उर्वरीत रक्कम एका दिवसानंतर दिली जाईल, असे म्हटल्याचे या व्हिडीओवरुन दिसून येते. दरम्यान, या प्रकरणाची तेलंगणा राष्ट्र समितीने तक्रार दिली असून निवडणूक आयोगाकडून याची चौकशी करण्यात येत आहे. 
 

Web Title: Note for vote! Congress leader trying to buy village for Rs 5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.