नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये जेमतेम महिनाभरात विधानसभा निवडणुका आटोपणार आहेत. मतदानाच्या तारखा जशा जवळ येत आहेत, तसे रोख रक्कम, मद्य, सोने तसेच अमली पदार्थांची जप्ती वाढली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तिपटीपेक्षा जास्त अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांतून यावेळी ९५३.३४ कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय महागडे दागिने, ड्रग्ज, मद्य, इत्यादी साहित्यही जप्त केले आहे.