‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 13:03 IST2024-10-27T13:02:56+5:302024-10-27T13:03:13+5:30
Rahul Gandhi : व्हिडीओसोबत राहुल यांनी लिहिले की, सलून चालकाचे ‘काहीच उरत नाही’ हे शब्द देशातील मेहनत करणाऱ्या गरिबाची आणि मध्यमवर्गीय व्यक्तीची कहाणी व्यक्त करतात.

‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
Rahul Gandhi : नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यम मंच ‘एक्स’वर एक व्हिडीओ जारी केला. त्यात ते दिल्लीतील एका हेअर कटिंग सलूनमध्ये दाढी करून घेताना दिसत आहेत. व्हिडीओसोबत राहुल यांनी लिहिले की, सलून चालकाचे ‘काहीच उरत नाही’ हे शब्द देशातील मेहनत करणाऱ्या गरिबाची आणि मध्यमवर्गीय व्यक्तीची कहाणी व्यक्त करतात.
राहुल गांधी यांनी भेट दिलेले सलून अजित नावाच्या व्यक्तीकडून चालवले जाते. या भेटीदरम्यान अजित यांनी राहुल गांधी यांना सांगितले की, राहुल गांधी यांना आपली कहाणी सांगितल्यानंतर आपल्याला आनंद व संतोष वाटला, असेही त्यांनी सांगितले.
तेव्हा सुख होते...
अजित यांनी राहुल गांधी यांना सांगितले की, काँग्रेसच्या राज्यात सुख होते. आधी वाटले की, भविष्य चांगले राहील; पण सगळेच इथल्या इथे राहिले. मी दिव्यांग आहे. मुलांचे भविष्य अंधकारमय आहे. तुमच्या राज्यात खूप खुश होतो. काँग्रेसच्या राज्यात ‘सुकून’ होता. गरिबांना सहारा देणारा कोणीतरी आहे. मला राहुल गांधी यांच्याशी बोलून खूप चांगले वाटले.