शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

सिडकोची २१९ अनधिकृत बांधकामांना नोटीस लवकरच कारवाई होणार : २०१३ नंतरच्या बांधकामांना अभय नाही

By admin | Published: August 07, 2015 9:35 PM

नवी मुंबई : सिडकोने अनधिकृत बांधकामांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. जानेवारी २०१३ नंतरच्या बांधकामांना अभय दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले असून २१९ बांधकामांना नोटीस दिली आहे. लवकरच कारवाई सुरू केली जाणार आहे.

नवी मुंबई : सिडकोने अनधिकृत बांधकामांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. जानेवारी २०१३ नंतरच्या बांधकामांना अभय दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले असून २१९ बांधकामांना नोटीस दिली आहे. लवकरच कारवाई सुरू केली जाणार आहे.
नवी मुंबईमधील मूळ गावठाणांमध्ये गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी पाठपुरावा सुरू केला आहे. जानेवारी २०१३ पर्यंतची घरे नियमित करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानंतरच्या बांधकामांवर कारवाई करण्यास सिडकोने सुरुवात केली आहे. जूनमध्ये सुरू केलेल्या कारवाईला प्रकल्पग्रस्तांनी तीव्र विरोध केला होता. ग्रामस्थांनी सिडकोवर भव्य मोर्चा काढून कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही दिवस थांबलेली कारवाई आता पुन्हा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिडकोने नवी मुंबई व पनवेल परिसरातील २१९ बांधकामांची यादी तयार केली आहे. विभागनिहाय अतिक्रमण करणार्‍यांची यादीच वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणत्याही स्थितीत १ जानेवारी २०१३ नंतर बांधलेली बांधकामे पाडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधितांना १० दिवसांची अंतिम नोटीस देण्यात आली असून त्यानंतर कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
सिडकोने पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध केली आहे. या बांधकामांवर कारवाई केल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील बांधकामे पाडली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामधील यादीमध्ये काही राजकीय पदाधिकार्‍यांचाही समावेश आहे. एका माजी नगरसेवकाला नोटीस देण्यात आली आहे. विद्यमान नगरसेवकाच्या पत्नीलाही नोटीस दिली आहे. यामुळे काही जणांचे नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोच्या भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये पुन्हा नाराजी निर्माण झाली आहे. पुन्हा या कारवाईिवरोधात आंदोलन सुरू होणार की सिडको कारवाई करण्यास यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
..........
नोटीसांचा विभागवार तपशील
विभागअतिक्रमणे
उरण१०
करंजाडे२०
पनवेल९
उलवे१८
तळोजा५
कामोठा१७
खारघर४२
दिघा३
कोपरखैरणे५
ऐरोली१३
नेरूळ२१
घणसोली३५
बेलापूर७
वाशी१३
सानपाडा१