शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

पीडितेचे नाव उघड झाल्याप्रकरणी केंद्राला नोटीस, दिल्ली उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 12:25 AM

पशुवैद्यक तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर तिला मारण्यात आले आणि तिचा मृतदेह आरोपींनी जाळून टाकण्यात आला.

नवी दिल्ली : हैदराबाद येथील पशुवैद्यक तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची बातमी देताना काही प्रसारमाध्यम समुहांनी तिचे नाव उघड केले. यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राचे मत मागविले आहे.दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल व न्या. सी. हरिशंकर यांच्या खंडपीठाने बुधवारी या प्रकरणी केंद्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली येथील राज्य सरकारे तसेच काही प्रसारमाध्यम समूहांना तसेच सोशल नेटवर्किंग साईट्सना नोटीसा जारी केल्या आहेत.पशुवैद्यक तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर तिला मारण्यात आले आणि तिचा मृतदेह आरोपींनी जाळून टाकण्यात आला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेत पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. या सर्व घडामोडींची बातमी देताना काही प्रसारमाध्यम समूहांनी व व्यक्तींनी या तरुणीचे नाव उघड केले. ही कृती कायद्याने गुन्हा आहे हे निदर्शनास आणून देणारी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली असून तिची पुढील सुनावणी १६ डिसेंबर रोजी होईल.या तरुणीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आलेल्या राजकीय नेत्यांना स्थानिक रहिवाशांनी कसे पिटाळून लावले याच्या बातम्या देतानाही काही प्रसारमाध्यमांनी तिच्या नावाचा उल्लेख केला होता असाही आक्षेप आहे.होऊ शकतो कारावासबलात्कार व अन्य काही गुन्ह्णांमधील पीडित व्यक्तीचे नाव उघड करणाऱ्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम २२८ अ नुसार दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा तसेच दंडही होऊ शकतो. हैदराबादमधील तरुणीचे नाव उघड करणारी प्रसारमाध्यमे तसेच व्यक्तींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत करण्यात आली आहे.

टॅग्स :Courtन्यायालय