शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

गुगल, याहू इंडियाला नोटीस

By admin | Published: August 19, 2015 1:13 AM

गर्भ लिंगनिदान जाहिराती रोखण्याचा न्यायालयाने आदेश देऊनही त्याचे उल्लंघन केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी गुगल इंडिया, याहू इंडिया

नवी दिल्ली : गर्भ लिंगनिदान जाहिराती रोखण्याचा न्यायालयाने आदेश देऊनही त्याचे उल्लंघन केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी गुगल इंडिया, याहू इंडिया आणि मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशनला नोटीस जारी करीत दोन आठवड्यांत उत्तर मागितले आहे.गर्भ लिंगनिदान जाहिरातींवर भारतात प्रतिबंध असतानाही सदर कंपन्यांकडून कायद्याचे उल्लंघन केले जात आहे, असे साबू मॅथ्यू जॉर्ज यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटले होते. जॉर्ज यांचे वकील संजय पारिख यांनी त्याकडे लक्ष वेधले असता दीपक मिश्रा आणि आर. बानूमथी यांच्या खंडपीठाने या सर्च इंजिन कंपन्यांना दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. संपूर्ण जगभरात सर्च इंजिन कंपन्यांना अशा जाहिराती रोखण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. भारतातही तसा आदेश देण्यात आला असता न्यायालयीन अधिकारक्षेत्र आणि तांत्रिक समस्येचा मुद्दा उपस्थित केला जात आहे, असे अ‍ॅड. पारिख यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)