Notice To Ola Uber: मोबाइल फोनच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवरुन भाड्यांबाबत भेदभाव करणाऱ्या प्रमुख ओला आणि उबरला आता सरकारने नोटीस बजावली आहे. भारत सरकारने या देशातील प्रमुख कॅब एग्रीगेटरकडून यासंदर्भात उत्तरे मागवली आहेत. जेव्हा अलीकडील अहवालात असे दिसून आले आहे की फोन मॉडेल्सवर प्रवासी भाड्याची किंमत बदलत आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. आम्हाला अशा तक्रारी आल्या आहेत ज्यात असे दिसून आले आहे की आयफोन आणि अँड्रॉइडमध्ये कॅब एग्रीगेटर वेगवेगळे भाडे आकारत आहेत, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी कॅब अॅग्रीगेटर्स ओला आणि उबर यांना नोटीस बजावल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राईड बुक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाईल डिव्हाइसच्या प्रकारावर आधारित फरकाच्या किंमतीवर सरकारने ओला आणि उबर यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. ग्राहक आयफोन वापरत आहे की अँड्रॉइड डिव्हाइस वापरत आहे यावर दोन्ही कंपन्या एकाच सेवेसाठी वेगवेगळे भाडे आकारत असल्याचे दिसून आल्याच्या वृत्तानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ही कारवाई केली आहे.
"वेगवेगळ्या मोबाइल मॉडेल्सवर (आयफोन/अँड्रॉइड) आधारित भाड्यात तफावत असल्याचे अलीकडेच निदर्शनास आले आहे. यावर कारवाई करत, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाद्वारे ग्राहक व्यवहार विभागाला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ओला आणि उबेर सारख्या प्रमुख कॅब एग्रीगेटर्स आणि त्यांची उत्तरे मागवली आहेत," असं मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे.
सुरुवातीच्या तपासात आढळून आले आहे की जेव्हा फोनचे मॉडेल वेगळे होते तेव्हा राईड्सच्या किंमती देखील वेगळ्या होत्या. ओला आणि उबेर आयफोन आणि अँड्रॉइड फोनवर वेगवेगळ्या किंमती दाखवत होत्या. ग्राहक व्यवहार विभागाने सीसीपीए जारी केले असून कॅब सेवेकडून उत्तर मागवलं आहे.
ग्राहकाच्या क्षमतेवर प्रवासाची किंमत?
ओला आणि उबेरचे अल्गोरिदम ग्राहकांच्या फोन मॉडेल्सचे विश्लेषण करत आहेत आणि त्यांच्या पेमेंट क्षमतेवर आधारित किंमती ठरवत आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही स्मार्टफोन आहेत. त्यांच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये फरक आहे. आयफोन अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. तर अँड्रॉइड फोन गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात.