ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - बाजारात लाँच होऊन अवघा एक आठवडाही उलटत नाही तोच बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेच्या आटा नूडल्स वादात सापडल्या आहेत. विनापरवाना आटा नूडल्सची विक्री केल्याबद्दल रामदेव बाबांच्या पंतजली संस्थेला राष्ट्रीय अन्नसुरक्षा व मानव प्राधिकरणाने (FSSAI) कारणे दाखवा नोटील बजावली आहे. तसेच या नूडल्स बनवणा-या आकाश योग या कंपनीलाही नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, रामदेव बाबांनी आम्ही कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचा दावा केला आहे. तसेच आम्हाला FSSAI ची नेटीस मिळाली नसल्याचंही रामदेव बाबा म्हणाले. जर आम्हाला अशी नोटीस मिलालीच तर आम्ही तिला योग्य ते उत्तर देऊ असेही रामदेवबाबाबांनी सांगितले आहे.
या आठवड्यातच बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेची आटा नूडल्स बाजारपेठेत दाखल झाली. मात्र त्यांच्या नूडल्सला FSSAI ने परवानगी दिली नव्हती, तरीही त्यांच्या नूडल्स विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने गदारोळ माजला होता. पण आपल्याकडे नूडल्सच्या विक्रीसाठी परवान असल्याचा दावा रामदेव बाबांनी केला होता.
मात्र तरीही FSSAIए पंतजली संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली असून १५ दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.