महाराष्ट्रात १२००० पोलिसांची भरती प्रस्तावित असताना आता आणखी एका राज्यामध्ये मोठी पोलीस भरती आयोजित करण्यात आली आहे. दिल्ली पोलीसमध्ये कॉन्स्टेबल एक्झीक्यूटिव्ह पदावर तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पुरुष आणि महिलांसाठी 6000 जागा निघाल्या आहेत. कर्मचारी निवड आयोग (SSC - Staff Selection Commission) द्वारे ही भरती आयोजित करण्यात आली आहे.
लॉकडाऊन नंतर मोठमोठ्या बँका, सरकारी संस्थांमध्ये बंपर जागा निघाल्या आहेत. स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, विविध राज्यांच्या ग्रामीण बँका आदी ठिकाणी जवळपास 15000 जागा निघाल्या आहेत. त्यांच्या अर्ज भरण्याची मुदतही संपण्याच्या जवळ आली आहे. अशातच आणखी सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.
Delhi Police constable recruitment 2020 ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून यामध्ये रिक्त जागा, पे स्केल आणि वयाची अट आदी माहिती देण्यात आली आहे.
रिक्त पदे कॉन्स्टेबल एक्झीक्यूटीव्ह (पुरुष) ओपन कॅटेगरी - 3433 पदेकॉन्स्टेबल एक्झीक्यूटीव्ह (पुरुष) माजी कर्मचारी (अन्य) - 226 पदेकॉन्स्टेबल एक्झीक्यूटीव्ह (पुरुष) माजी कर्मचारी (कमांडो) - 243 पदेकॉन्स्टेबल एक्झीक्यूटीव्ह (महिला) - 1944 पदेएकूण पदे - 5,846
आरक्षणयामध्ये सामान्य क्षेणीसाठी 2,801 जागा असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 583 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ओबीसीसाठी 1,123 जागा, एससीसाठी 1,037 जागा, एसटीसाठी 302 जागा राखीव आहेत. पगार दिल्लीपोलिसांच्या या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल ३ चा पगार दिला जाणार आहे. पेस्केल 5200 ते 20200 रुपये असणार आहे. तर ग्रेड पे 2000 रुपये असणार आहे.
वयाची अटउमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे असावे अशी महत्वाची अट आहे. याशिवाय आरक्षणानुसार उमेदवारांना वयाची अट आहे. हे वय 31 डिसेंबर 2020 पर्यतचे गृहीत धरले जाणार आहे.
सध्या या जागांसाठी छोटी नोटिस काढण्यात आली असून सविस्तर जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कुठेय मंदी! 'या' बँकेच्या संचालकाला सर्वाधिक वेतन; उदय कोटक यांचा पगार घटला
हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती?
बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई
चीन गांगरला! जपान भारतापेक्षाही जबर दणका देण्याच्या तयारीत; 57 कंपन्यांना दिले आदेश
SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल
दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर