नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व ‘आप’च्या अन्य पाच नेत्यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.संयुक्त निबंधक कोवई वेणुगोपाल यांनी केजरीवाल, कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंग, राघव चड्डा आणि दीपक वाजपेयी यांना नोटीस जारी केली. खोटे आणि अवमानजनक वक्तव्य केल्यावरून या ‘आप’ नेत्यांच्या विरुद्ध दहा कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा जेटली यांनी ठोकला आहे. ‘प्रतिवादींना (आप नेते) नोटीस जारी करण्यात येत आहे. प्रतिवादींनी तीन आठवड्यांच्या आत लेखी म्हणणे दाखल करावे. त्यानंतर अर्जदार (जेटली) त्यांचे म्हणणे दाखल करतील,’ असे निबंधकांनी म्हटले आहे. दस्तऐवज सादर करणे आणि ते नाकारण्यासाठी ५ फेब्रुवारी २०१६ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)> डीडीसीए कारवाई रोखण्यासाठीच सीबीआयचे छापे -सिसोदियानवी दिल्ली : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधील (डीडीसीए) कथित गैरप्रकाराशी संबंधित फायलींची छाननी करण्याच्या उद्देशानेच दिल्ली सचिवालयात सीबीआयचे छापे घालण्यात आल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात केला. डीडीसीए घोटाळा आणि चौकशी आयोगाच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या सीबीआय छाप्यादरम्यान सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीविषयी विचारणा केली आणि प्रमुख सचिव राजेंद्र कुमार यांची चौकशी करण्याच्या बहाण्याने सीएमओ कक्षात ठेवलेली प्रत्येक फाईल हुडकली, असा दावा सिसोदिया यांनी केला.
आपच्या पाच नेत्यांना नोटीस
By admin | Published: December 23, 2015 2:33 AM