शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

११६ शिक्षकांसह १० बीओंना नोटिसा

By admin | Published: July 23, 2016 12:02 AM

जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे महसूल यंत्रणेने केलेल्या तपासणीमध्ये त्रुटी आढळलेल्या १० तालुक्यांमधील ११६ शिक्षकांना तसेच १० तालुक्यांमधील गटशिक्षणाधिकार्‍यांना शुक्रवारी सायंकाळी नोटिसा देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या नोटिसा बजावल्या असून, सात दिवसात खुलासा मागविला आहे.

जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे महसूल यंत्रणेने केलेल्या तपासणीमध्ये त्रुटी आढळलेल्या १० तालुक्यांमधील ११६ शिक्षकांना तसेच १० तालुक्यांमधील गटशिक्षणाधिकार्‍यांना शुक्रवारी सायंकाळी नोटिसा देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या नोटिसा बजावल्या असून, सात दिवसात खुलासा मागविला आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार १५ तालुक्यांमध्ये जि.प.च्या शाळांमध्ये १४ जुलै रोजी तहसीलदार व त्यांच्या पथकांनी तपासणी केली होती. त्यात अमळनेर, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा पाच तालुक्यांमधील १२३ शाळांच्या तपासणी अहवालांच्या छाननीनंतर ९७ शाळांंच्या मुख्याध्यापकांना शिस्तभंगविषयक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
आता १० तालुक्यांमधील ११६ शिक्षकांना व संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकार्‍यांनाही नोटिसा दिल्या आहेत. आता नोटिसा दिलेल्या शिक्षकांची तालुकानिहाय संख्या : भडगाव ११, जळगाव १८, जामनेर ११, धरणगाव २, एरंडोल २, मुक्ताईनगर ४, पाचोरा १८, पारोळा १६, रावेर २१, यावल १३. यापूर्वी अमळनेर तालुक्यातील १६ , भुसावळ २५, बोदवड १६, चाळीसगाव २४, तर चोपडा तालुक्यातील १६.

आतापर्यंत सर्व १५ तालुक्यांमधील ३२२ शाळांच्या तपासणी अहवालांची छाननी पूर्ण झाली असून, एकूण २१३ शिक्षक व १५ गटशिक्षणाधिकारी यांना नोटिसा दिल्या आहेत.
नोटिसा बजावलेल्या शिक्षकांसह १० तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना सात दिवसात खुलासा द्यावा लागणार आहे. खुलासा समाधानकारक, वस्तुस्थितीला धरून नसला तर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनाही आपला खुलासा द्यावा लागेल. संबंधित गटशिक्षणाधिकार्‍यांनी आपापल्या तालुक्यातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्याकडून खुलासे मागवावेत, असे आदेशही देण्यात आले आहेत.