नवी दिल्ली : उत्तरेकडील छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, ईशान्येकडील मिझोरम व दक्षिण भारतातील तेलंगण या पाच राज्यांमध्ये नोव्हेंबर व डिसेंबरात विधानसभा निवडणुका होणार असून, पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांची ही नांदीच असेल. या मिनी सर्वात्रिक निवडणुका असून, जनता पुन्हा भाजपाला मते देते की काँग्रेसला कौल देते, याची ही रंगीत तालिमच असेल.यापैकी छत्तीसगढ, राजस्थान व मध्य प्रदेशात भाजपाची सरकारे आहेत. तिथे काँग्रेसची स्थिती सुधारल्याचे ओपिनियन पोलमधून दिसत आहे. प्रत्यक्षात तसे घडते का, हे मतदानातून स्पष्ट होईल.भाजपा व काँग्रेस या महत्त्वाच्या पक्षांनी या तिन्ही राज्यांत सारी ताकद लावली आहे. भाजपातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा हे तिथे स्टार प्रचारक आहेत. काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांनी प्रचाराची धुरा उचलली आहे. मात्र, मध्य प्रदेशची जबाबदारी कमलनाथ व ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर तर राजस्थानची जबाबदारी अशोक गेहलोत यांच्यावर आहे.तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी विधानसभा बरखास्तीचा निर्णय घेतल्याने मुदतपूर्व निवडणुका होत असून, तिथे तेलंगण राष्ट्रीय समिती, भाजपा व काँग्रेस व तेलगू देसम यांची आघाडी अशी तिरंगी लढत होईल. मिझोरमध्ये मात्र काँग्रेस सत्तेत असून, ती टिकवणे काँग्रेसपुढील आव्हान आहे.काँग्रेसचा आक्षेपदुपारी १२ वाजता होणार होती.अचानक ती वेळ दुपारी तीनची करण्यात आली. मोदी यांना राजस्थानच्या जाहीर सभेत प्रचार करता यावा, यासाठी मुद्दाम हा बदल केल्याचा आरोप काँग्रेसने केला.राज्यनिहाय निवडणूक कार्यक्रमछत्तीसगढ- 90पहिला टप्पा : १२ नोव्हेंबर (१८ जागा)दुसरा टप्पा : २० नोव्हेंबर (७२ जागा)मध्य प्रदेश- 230मतदान : २८ नोव्हेंबरराजस्थान -200मतदान: ७ डिसेंबरतेलंगण - 119मतदान: ७ डिसेंबरमिझोरम- 40मतदान: २८ नोव्हेंबरमतमोजणी - ११ डिसेंबर
भाजपा की काँग्रेस याचा होणार फैसला : नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मिनी सार्वत्रिक निवडणुका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 6:26 AM