ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. १७ - मॅगीपाठोपाठ आता चिंग सिक्रेट या कंपनीच्या मंचुरियन नुडल्समध्येही आरोग्यास अपायकारक ठरणारे पदार्थ असल्याचे एका तपासणीतून समोर आले आहे. मध्यप्रदेशमधील भोपाळ येथील चिंग सिक्रेटच्या नमुन्यांमध्ये 0.६५ टक्के मोनो सोडियम ग्लूटामेट (एमएसजी) आढळले आहे.
मॅगीमध्ये शिसे व मोनोसोडियम ग्लुटामेट आढळल्याची घटना ताजी असतानाच भोपाळमधील अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध ठिकाणांहून नुडल्सचे ३८ नमुने गोळा केले होते. यात चिंग सिक्रेटच्या मंचुरियन नुडल्सचाही समावेश होता. त्यामुळे प्रशासनाने चिंग सिक्रेटच्या नुडल्सवर कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. मोनोसोडियम ग्लुटामेट हा पदार्थ मर्यादेपेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्यास अपायकारक ठरु शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.