नवी दिल्ली - नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाना आज जाहीर केला आहे. यावेळी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. तसेच यावेळी टपाली मतदानाबाबतही निवडणूक आयुक्तांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिव्यांग आणि 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही टपाली मतदानाने मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.यापूर्वी ठराविक विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच सैन्यदल आणि पोलीस खात्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांनाच टपाली मतदानाची सुविधा दिली जात असे. मात्र इतर सर्वसामान्य माणसांना टपाली मतदानाद्वारे मतदानाची संधी मिळत नसे. मात्र आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे दिव्यांग 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही टपाली मतदानाने मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
आता आजी-आजोबाही करू शकणार पोस्टल बॅलेटने मतदान; दिल्लीपासून शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 5:50 PM