नवी दिल्ली : यापुढे देशांतर्गत, तसेच परदेशी विमान प्रवास करतानाही आधार कार्डची सक्ती होण्याची शक्यता आहे. आधार क्रमांकाशिवाय तिकीट काढणे शक्य होणार नाही. केंद्र सरकारने आयटी क्षेत्रातील अग्रणी असलेल्या विप्रो कंपनीकडे यासंबंधी ब्लू-प्रिंट विकसित करण्याची जबाबदारी सोपवली असल्याचे कळते. विप्रो मे महिन्यापर्यंत अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रवाशांच्या अंगठ्याचा ठसा वापरून त्यांच्या उड्डाणाशी संबंधित सर्व माहिती घेणे सुरू होईल, असा अंदाज आहे. प्रवाशांची बायोमेट्रिक माहिती विमानतळांवर वापरण्यात येईल. तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी पासपोर्ट गरजेचा असतो, त्याप्रमाणे आंतरदेशीय उड्डाणांसाठी अंगठ्याचा ठसा आवश्यक ठरेल. नागरी विमान वाहतून मंत्रालय प्रवासाच्या बुकिंगसाठी आधार नंबर लिंक करण्याच्या विचारात आहे. सर्व विमानतळांवर बायोमेट्रिक प्रवेश सुरू करण्याचा विचार आहे. विमानतळ संचालक आणि एअरलाइन्सची नागरी उड्डाण मंत्री जयंत सिन्हा आणि सचिव आर चौबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर हिरवा कंदील दाखवत पाऊल टाकण्यास सुरुवात झाली आहे. सध्या विमानतळांवर प्रवाशांना तिकीटासोबत ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे. त्याशिवाय प्रवाशांना टर्मिनलमध्ये प्रवेश दिला जात नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)>शिरतानाच ठसातिकीट काढताना प्रवाशांना आपला आधार कार्ड क्रमांक द्यावा लागेल व विमानतळाच्या एन्ट्री पॉइंटला टच पॅडवर अंगठ्याचा ठसा घेतला जाईल. टर्मिनलमध्ये प्रवेश केल्यावर चेक-इन करतानाही त्यांना हीच प्रक्रिया करावी लागेल.
विमानप्रवासासाठी आता आधार अनिवार्य
By admin | Published: April 06, 2017 4:26 AM