शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

आता सेन्सॉर बोर्डच ‘कात्री’त!

By admin | Published: June 14, 2016 4:57 AM

‘उडता पंजाब’ चित्रपटामध्ये १३ कट सुचवणाऱ्या सेन्सॉर बोर्डाला (सीबीएफसी) सोमवारी उच्च न्यायालयाने दणका दिला. या चित्रपटात केवळ एक कट सुचवून ‘डिस्क्लेमर’मध्ये थोडी सुधारणा

मुंबई : ‘उडता पंजाब’ चित्रपटामध्ये १३ कट सुचवणाऱ्या सेन्सॉर बोर्डाला (सीबीएफसी) सोमवारी उच्च न्यायालयाने दणका दिला. या चित्रपटात केवळ एक कट सुचवून ‘डिस्क्लेमर’मध्ये थोडी सुधारणा करण्याचे आदेश देत न्यायालयाने चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला आहे. तसेच या निर्णयामुळे सेन्सॉर बोर्डच कात्रीत सापडले आहे. सीबीएफसीने १३ दृश्ये कट करण्याचे दिलेले आदेश रद्द करण्यात येत आहेत. केवळ सार्वजनिक जागेवर लघवी करत असल्याचे दृश्य कट करण्यात यावे व डिस्क्लेमरमध्ये थोडी सुधारणा करावी, असे न्या. एस.सी. धर्माधिकारी व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती सेन्सॉर बोर्डाचे वकील अद्वैत सेठना यांनी खंडपीठाला केली. मात्र निर्मात्याने या चित्रपटाकरिता व प्रमोशनसाठी केलेला खर्च लक्षात घेत खंडपीठाने आदेशास स्थगिती देण्यास नकार दिला. अनुराग कश्यप यांच्या पॅन्थम फिल्म्सने सीबीएफसीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. दिग्दर्शकाच्या कल्पकतेवर निर्बंध घालण्याचे काम करत असल्याबद्दल न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला धारेवर धरले. एखादा चित्रपट सेन्सॉर करण्याचा अधिकार सेन्सॉर बोर्डाला नाही. कारण सेन्सॉर या शब्दाचा उल्लेख सिनेमॅटोग्राफ कायद्यात नाही, असेही खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाच्या निदर्शनास आणले. या चित्रपटाच्या विषयाचा विचार तुकड्या तुकड्यांत करू नये. हा एकच विषय आहे. त्यामुळे गाणी, भाषा, फलक या बाबी गौण आहेत. पार्श्वभूमी, व्यवस्था, संकल्पना आणि कथेची निवड करण्याचा अधिकार कल्पक माणसाला आहे. दिग्दर्शक काही शब्द निवडू शकतो; त्याला याबाबत कोणीही काही सांगण्याची आवश्यकता नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.पंजाबच्या तरुणांमध्ये ड्रग्सचे व्यसन वाढत असल्याच्या दिग्दर्शकाच्या मताशी न्यायालयानेही सहमती दर्शवली. तसेच चित्रपटातून निवडणूक, खासदार, आमदार, पंजाब यांसारखे शब्द वगळण्याच्या सीबीएफसीच्या सूचनेवर खंडपीठाने म्हटले की, हे सामान्य शब्द आहेत. मात्र कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ‘उडता पंजाब’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. डिस्क्लेमरमधील बदलदिग्दर्शकाला या चित्रपटाच्या डिस्क्लेमरमधून पाकिस्तानचा उल्लेख वगळावा लागणार आहे. तसेच हा चित्रपट, यातील पात्र आणि दिग्दर्शक ड्रग्ज आणि शिवराळ भाषेची जाहिरात करत नसून हा चित्रपट केवळ ड्रग्जचे सेवन करण्याऱ्यांचे वास्तव दाखवत आहे, असे दिग्दर्शकाला डिस्क्लेमरमध्ये नमूद करावे लागणार आहे. तसेच सार्वजनिक जागेवर लघवी करण्याचे दृश्य कट करण्याबाबत सीबीएफसीचे म्हणणे योग्य असल्याचे खंडपीठाने म्हटले. हे दृश्य अनावश्यक आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. (प्रतिनिधी)- 17 जूनला चित्रपट प्रदर्शित होत असल्याने न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला येत्या ४८ तासांत प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिला आहे.देशाच्या सार्वभौमत्व, एकात्मता, सुरक्षेला धोका नाही!या चित्रपटाची संहिता आम्ही वाचली आहे. या चित्रपटामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला, एकात्मतेला आणि सुरक्षेला धोका नाही. चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यापूर्वी त्यातील काही दृश्ये कट करण्याचा, बदल करण्याचा आणि काही दृश्ये वगळण्याचा अधिकार सीबीएफसीला आहे.मात्र या दृश्यांमुळे देशाच्या एकात्मतेला, सार्वभौमत्वाला किंवा सुरक्षेला धोका निर्माण होणार असेल तरच हे अधिकार वापरले जाऊ शकतात. ठोस कारणास्तव चित्रपटावर प्रतिबंध घालण्यात आला आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी बोर्डावर आहे, असेही खंडपीठाने म्हटले.सेन्सॉर बोर्डाने ‘आजी’सारखे वागू नये...सेन्सॉर बोर्डाने ‘आजी’सारखे वागू नये. काळाप्रमाणे स्वत:मध्ये बदल करून घ्यावा, असे ताशेरे सेन्सॉर बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर ओढताना उच्च न्यायालयाने सांगितले की, ‘सेन्सॉर बोर्डाने या प्रकरणी अतिसंवेदनशीलता दाखवू नये. कल्पक माणसांच्या कल्पना बोर्डाने रोखू नयेत. बोर्डाचे हे वर्तन नव्या कलाकृतींच्या निर्मितीपासून परावृत्त करणारे आहे. अलीकडे चित्रपट दिग्दर्शक थेट विषयाला हात घालतात. थेट आणि सरळपणे विषय मांडतात. मात्र त्यामुळे त्यांचा अशा प्रकारे छळ करण्याची आवश्यकता नाही,’ असे खंडपीठाने म्हटले.