नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादामुळे दोन्ही देशांच्या लष्करात अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. भारताने एलएसीपर्यंत (LAC) रस्त्यांचे जाळे विणले, तर चीनने आपली पाळत ठेवणारी यंत्रणा (सर्व्हिलान्स सिस्टम) मजबूत केली. दरम्यान, वास्तविक नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराचे संभाषण डीकोड करण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या ऑपरेशनची अंमलबजावणी चीनने सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
चीनने आधीच 2022 मध्ये ही टीएमडी म्हणजेच तिबेट मिलिटरी डिस्ट्रिक्टमध्ये हिंदी ट्रान्सलेटर किंवा इंटरप्रेटरच्या भरतीसाठी तरुण पदवीधरांचा शोध सुरू केला होता. आता चीनचा हा शोध एका वर्षात संपला. गुप्तचर रिपोर्टनुसार, चीनी पीएलएने अलीकडेच अशा 19 विद्यार्थ्यांना सामील केले आहे, ज्यांची हिंदीवर मजबूत पकड आहे. चीनी पीएलएमध्ये हिंदी हिंदी ट्रान्सलेटर किंवा इंटरप्रेटरचा समावेश करण्यामागील काही प्रमुख उद्दिष्टांमध्ये चीनी पीएलएसाठी गुप्तचर माहिती गोळा करणे, भारतीय सैन्याच्या सैनिकांच्या संभाषणांचे ट्रान्सक्रिप्टला मँडरिनमध्ये ट्रान्सलेट करणे आणि एलएसीवरील हेरगिरी यांचा समावेश आहे.
याशिवाय, हे लोक भारतीय लष्कराचे संभाषण समजून घेण्यासाठी एलएसीवर तैनात असलेल्या सैनिकांना हिंदी शिकवतील. टीएमडीच्या अनेक अधिकार्यांनी 25 मार्च 2022 ते 9 एप्रिल 2022 दरम्यान चीनमधील अनेक संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठांना भेटी देऊन हिंदीत प्रवीण असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केली. यादरम्यान, हिंदी इंटरप्रेटरची गरज आणि पीएलएमधील त्यांचे कार्य समजावून सांगण्यासाठी परिसंवाद आणि व्याख्याने देण्यात आली. या भरतीसाठी अंतिम मुदतही निश्चित करण्यात आली होती.
चीनने तिबेटची शिक्षण व्यवस्था आधीच बदलली आहे. सर्व शाळांमध्ये मँडरिन भाषा ही पहिली भाषा म्हणून लागू करण्यात आली आहे. तसेच, चिनी सैन्य आता एलएसीजवळील गावांमध्ये तिबेटी कुटुंबातील शाळेत जाणाऱ्या मुलांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. गुप्तचर रिपोर्टनुसार, चीनी पीएलए शिकान्हे लष्करी छावणीत 10 ते 18 वयोगटातील मुलांना चीनी, बोधी आणि हिंदी भाषेचे प्रशिक्षण देत आहे.
याचबरोबर, पीएलएने भारतासोबत एलएसीजवळील छावण्यांमध्ये राहणार्या हिंदी भाषिक तिबेटी लोकांची भरती केली होती, अशी काही माहिती समोर आली आहे. तसेच, चीनचा प्रयत्न असा आहे की, ते भारतीय लष्कर आणि एलएसीजवळील गावांमध्ये राहणाऱ्या लोकांचे शब्द सहज समजू शकेल. दरम्यान, एक प्रकारे, असे म्हणता येईल की, चीन आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पीएलएमध्ये हेर म्हणून भरती करण्याचा प्रयत्न करीत आहे.