शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

CoronaVirus: ऐकावं ते नवलच! संकटापासून बचावासाठी थेट कोरोना देवीची स्थापना; धोका कमी होत असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 1:38 PM

CoronaVirus: कोईम्बतूर भागातील इरुगुरमधील कमाचीपुरी आदिनाम मंदिराने थेट कोरोना देवीची मूर्ती तयार करून तिची स्थापना केली आहे.

ठळक मुद्देसंकटापासून बचावासाठी थेट कोरोना देवीची स्थापनाकोरोनासाठी विशेष पूजा आणि प्रार्थनायापूर्वीही आजारांच्या बचावासाठी देवीची स्थापना

कोईम्बतूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. कोरोनाच्या थैमानामुळे बेड्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. देशभरातील डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. मात्र, तामिळनाडूतील कोईम्बतूर येथून अजबच प्रकार समोर आला आहे. कोरोना संकटापासून बचावासाठी येथे चक्क कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाचा धोका कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. (now coimbatore temple established corona devi to protect people from coronavirus)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे. अनेक राज्यांमध्ये अंशतः तर काही राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी नियमांचे पालन आणि लसीकरण हे दोन महत्त्वाचे पर्याय मानले जात आहेत. एकीकडे शास्त्रज्ज्ञ विज्ञानाच्या मदतीने कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे काही ठिकाणी श्रद्धेचा मार्गाने कोरोनाला पळवून लावण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे.

“जनतेला पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये भविष्य दिसत नाही”; मनसेची टीका

थेट कोरोना देवीची स्थापना

देशाच्या काही भागांमधून कोरोना देवीच्या पूजेबाबतच्या बातम्या समोर येत आहेत. आता तमिळनाडूच्या कोईम्बतूरमधूनही असाच प्रकार उघडकीस आला आहे. कोईम्बतूर भागातील इरुगुरमधील कमाचीपुरी आदिनाम मंदिराने थेट कोरोना देवीची मूर्ती तयार करून तिची स्थापना केली आहे. तसेच या कोरोना देवीची पूजा करण्याचाही निर्णय घेतल्याची माहिती मिळाली असून, यामुळे कोरोना संसर्गापासून बचाव होऊ शकेल, असा दावा मंदिर प्रशासनाकडून करण्यात आला आहे. 

पंतप्रधान मोदी अविरतपणे जनतेची सेवा करतायत, तर काँग्रेस संभ्रम पसरवतेय: जेपी नड्डा

यापूर्वीही आजारांच्या बचावासाठी देवीची स्थापना

यापूर्वीही कॉलरा आणि प्लेग यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी देवीची स्थापना करून पूजा करण्यात आली होती. लोकांना आजारांपासून वाचवण्याची ही परंपरा आहे. यापूर्वी प्लेगसह इतर काही इतर देवी-देवतांची मूर्ती तयार करण्यात आली होती, अशी माहिती आदिनाम मंदिरातील व्यवस्थापक सिवालिनेजेश्वर यांनी सांगितले. 

Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस!

कोरोनासाठी विशेष पूजा आणि प्रार्थना

मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक ग्रोनाइटपासून दीड फूट उंचीची कोरोना देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. इतकेच नाही तर, इथे कोरोनासाठी विशेष पूजा आणि प्रार्थनाही केली जाणार असून, ४८ दिवसांच्या  महायज्ञ करण्यात येणार आहे. मात्र, सामान्य नागरिकांना यात सहभागी होता येणार नाही. महायज्ञ पूर्ण झाल्यानंतरच सामान्य नागरिक कोरोना देवीचे दर्शन घेऊ शकतील, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसTamilnaduतामिळनाडूSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके