शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आता लक्ष आपच्या आश्वासन पूर्ततेकडे

By admin | Published: February 11, 2015 11:19 PM

नवी दिल्ली- दिल्ली निवडणुकीत अफाट विजय प्राप्त करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने मतदारांना नेमकी कुठली आश्वासने दिली होती याचा ऊहापोह या निकालाच्या निमित्ताने होतो आहे. कारण ही आश्वासनेच आपच्या यशाचे गमक आहे,असेही म्हणता येईल. त्यामुळेआता सत्तेत आल्यानंतर पक्ष दिलेल्या वचनांची कशी पूर्तता करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...


नवी दिल्ली- दिल्ली निवडणुकीत अफाट विजय प्राप्त करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने मतदारांना नेमकी कुठली आश्वासने दिली होती याचा ऊहापोह या निकालाच्या निमित्ताने होतो आहे. कारण ही आश्वासनेच आपच्या यशाचे गमक आहे,असेही म्हणता येईल. त्यामुळेआता सत्तेत आल्यानंतर पक्ष दिलेल्या वचनांची कशी पूर्तता करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आपचा १५ सूत्री वचननामा
१.दिल्ली जनलोकपाल विधेयक
भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा ठोठावण्याचा अधिकार देणारे दिल्ली जनलोकपाल विधेयक.
२. स्वराज विधेयक
जनतेच्या हाती सत्ता सोपविण्याची तरतूद असलेले स्वराज विधेयक. स्थानिक जनतेचे दैनंदिन जीवन प्रभावित करणारे सर्व निर्णय नागरिक घेतील आणि सचिवालयामार्फत त्यांची अंमलबजावणी होईल.
३. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा
दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येईल. याअंतर्गत डीडीए, एमसीटी आणि दिल्ली पोलीस आदी स्थानिक प्रशासनिक संस्था नवनिर्वाचित दिल्ली सरकारला जबाबदार राहतील.
४. विजेची बिले निम्म्यावर
आपतर्फे कॅगला डिसकॉमचे लेखापरीक्षण करण्यास सांगितले जाईल. तसेच कंपनीतर्फे अवाजवी दरवाढ केली जात असल्याकडे लक्ष वेधून विजेचे दर निम्म्यावर आणले जातील.
५.डिस्कॉम पोर्टेबिलिटी
वीज ग्राहकांना वीज पुरवठादार कंपनी निवडीचा अधिकार दिला जाईल. यामुळे कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होण्यासोबतच वीज दरही कम होतील,असे आपचे म्हणणे आहे.
६.दिल्लीला सोलर सिटी बनविणार
अक्षयऊर्जा आणि ऊर्जेचे इतर पर्यायी स्रोत निर्मितीला प्राधान्य.
७. पाण्याचा अधिकार
दिल्लीकरांना वाजवी दरात पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविणार. हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे.
८. मोफत पाणी
प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला २० किलो लिटर्स (२०,००० लिटर्स) पाणी मोफत दिले जाईल. परंतु पाण्याचा वापर २० किलोलिटर्सच्यावर गेल्यास मात्र पूर्ण बिल भरावे लागणार. वार्षिक १० टक्के दरवाढीचा नियम रद्द केला जाईलआणि ही दरवाढ विचारविनिमयानंतर केली जाईल.
९. यमुनेचे पुनरुज्जीवन
शहरातील संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी आवश्यक क्षमतेच्या प्रकल्पाची निर्मिती.
१०. सार्वजनिक स्वच्छतागृहे
शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये दीड लाख आणि सार्वजनिक ठिकाणी ५०,००० स्वच्छतागृहे बांधणार. यापैकी एक लाख स्वच्छतागृहे महिलांसाठी असतील.
११. नवीन शाळा
दिल्लीत राहणाऱ्या प्रत्येक बालकाला सहजपणे दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ५०० नवीन शाळा सुरू करणार. यात प्रामुख्याने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणावर भर असेल.
१२. नवीन महाविद्यालये
दिल्लीतील खेडेगावांच्या सहभागाने शहरालगतच्या परिसरात दिल्ली प्रशासनाच्या अंतर्गत २० नवीन महाविद्यालयांची स्थापना.
१३. शुल्क नियमन
खासगी शाळांमधील शुल्काचे नियमन करण्यासोबतच कॅपिटेशन फी पूर्णत: रद्द केली जाईल.
१४. ई गव्हर्नन्स
सर्व शासकीय सेवा आणि अर्ज ऑनलाईन उपलब्ध केले जातील. याशिवाय सरकारचे प्रकल्प, त्यांचा प्रगती अहवाल, अकाऊंटस् आदींची माहितीही ऑनलाईन मिळेल.
१५. स्मार्ट दिल्ली
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात मोफत वाय-फाय. शिवाय डीटीसीच्या बसेस, बस स्थानके आणि इतर गर्दीच्या ठिकाणांवर १०,००० सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.