ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १७ - 'उडता पंजाब' चित्रपटाने सेन्सॉर बोर्डा विरुद्धची लढाई जिंकली असली तरी, आता आणखी दोन गुजराती चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडले आहेत. सलगतो सवाल : अनामत आणि पावर ऑफ पाटीदार या दोन चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाचा अडथळा पार करावा लागणार आहे.
हे दोन्ही चित्रपट मागच्यावर्षी गुजरातमध्ये आरक्षणासाठी झालेले पाटीदार समाजाचे आंदोलन आणि या आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलवर आधारीत आहेत. 'सलगतो सवाल: अनामत' चित्रपटाला सेन्सॉरने १०० कट सुचवले आहेत. पटेल आणि पाटीदार हे शब्दही वगळण्याची सूचना केली आहे.
'पावर ऑफ पाटीदार' चित्रपटाचे निर्माते मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यासह अन्य मंत्र्यांसाठी चित्रपटाचा विशेष खेळही ठेवायला तयार आहेत. जर त्यांनी आमची विनंती मान्य केली तर, त्यांच्या वेळेनुसार आम्ही चित्रपटाचा विशेष खेळ त्यांना दाखवू असे पावर ऑफ पाटीदारच्या निर्मात्याने सांगितले.