नवी दिल्ली: भारतीय रेल्वेनं नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे. रेल्वे प्रवासी रात्रीच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप चार्ज करू शकणार नाहीत. रेल्वे प्रशासनानं घेतलेल्या निर्णयाचा फटका हजारो प्रवाशांना बसणार आहे. रेल्वे प्रवासादरम्यान घडणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. बंगळुरू मिररनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.खूशखबर! 10 वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज? प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वेनं हा निर्णय घेतल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. त्यामुळे रात्री ११ ते पहाटे ५ दरम्यान रेल्वे गाड्यांमधील चार्जिंग पॉईंट बंद राहतील. त्यामुळे प्रवाशांना त्यांचा वापर करता येणार नाही.रेल्वेने विकसित केला एसी-३ इकॉनॉमिक कोच खास, माफक तिकिटात सुविधा मिळणार हाय क्लास१३ मार्चला दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसमध्ये भीषण आग लागली होती. एका डब्यात लागलेली आग बघता बघता सात डब्यांपर्यंत पोहोचली. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. या घटनेनंतर रेल्वेनं सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची पावलं टाकण्यास सुरुवात केली.धुम्रपानाविरोधात रेल्वे प्रशासन कठोरधुम्रपानाविरोधातले नियमदेखील रेल्वेकडून आणखी कठोर करण्यात येणार आहेत. रेल्वेत धुम्रपान करणाऱ्यांकडून सध्या कलम १६७ च्या अंतर्गत केवळ १०० रुपये दंड आकारला जातो. हा दंड वाढवणाऱ्याचा रेल्वेचा विचार आहे. रेल्वे गाड्या किंवा रेल्वे स्थानकांच्या परिसराात धुम्रपान करणाऱ्यांसाठी थेट तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा विचारदेखील सुरू आहे.
प्रवासी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतला; हजारो प्रवाशांवर थेट परिणाम होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 7:45 PM