ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - आपल्या लोकांशी कनेक्टेड राहण्यासाठी आजकाल लोकांकडून सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅप ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत चालली असून फोनद्वारे सहज अॅक्सेस करता येणा-या व्हॉट्सअॅपला तर तरूणांची खूप पसंती आहे. आता याच व्हॉट्सअॅपवरून तुम्हाला मोबाईल वा लँडलाइनवर डायरेक्ट थेट फोन करणं शक्य होणार आहे.
इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि टेलिकॉम ऑपरेटर्सदरम्यानच्या इंटर-कनेक्ट कराराला सरकारच्या इंटर-मिनिस्ट्रीअल पॅनलतर्फे हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअॅप, स्काईप, व्हायबरवरूनही कॉल करण्याची ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.
या अॅप्सवरून मोबाईल वा लँडलाइन नंबरवर करण्याचे हे फीचर उपलब्ध झाल्यास व्हॉईस कॉलचे चार्जेस कमी होण्याची शक्यता आहे.