ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - ग्राहकांना आता पाचवर्ष पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची (पीपीएफ) रक्कम काढून घेता येईल.
उच्चशिक्षण आणि वैद्यकीय उपचारांसाठी पैशांची आवश्यकता असेल तर, ग्राहकांना मुदतपूर्व सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीची रक्कम काढून घेता येईल असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने सोमवारी सांगितले.
खातेधारकाला त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या वैद्यकीय उपचारासाठी किंवा उच्चशिक्षणासाठी पैशांची आवश्यकता असेल तर, आवश्यक कागदपत्रे सादर करुन पैसे काढता येतील असे अर्थमंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे. पीपीएफ धारकाला अशी मुदतपूर्व खाते बंद करण्याची सुविधा पाचवर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळेल.