नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक आता झाली, तर भाजपाच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ला (रालोआ) बहुमतासाठी किमान आवश्यक असलेल्या २७२ जागांहून सुमारे १५ जागा कमी मिळतील, असा निष्कर्ष इंडिया टीव्ही-सीएनएक्स यांनी घेतलेल्या एका जनमत चाचणीतून काढण्यात आला आहे. या ताज्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी भाजपाला २२, शिवसेनेला आठ, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी नऊ जागा मिळू शकतील.
पाच राज्य विधानसभांच्या निवडणुकांनंतर आणि त्यापैकी राजस्थान, छत्तीसगढ व मध्यप्रदेश या तीन राज्यांत काँग्रेसने भाजपाकडून सत्ता हिसकावून घेतल्यानंतर १५ ते २५ डिसेंबर यादरम्यान लोकसभेच्या सर्व ५४३ मतदारसंघांमध्ये ही जनमत चाचणी घेऊन लोकमताचा कौल अजमावण्यात आला. त्यावरून असे दिसते की, आता लोकसभा निवडणूक झाल्यास कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही. ‘रालोआ’ला २५७ पर्यंत व सपा आणि बसपा वगळून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संयुक्त लोकशाही आघाडी’ला (संपुआ) १४६ जागा मिळू शकतील.अशा त्रिशंकू अवस्थेत सरकार स्थापनेची गुरुकिल्ली या दोन्ही आघाड्यांखेरीज ‘इतर’ पक्षांच्या हाती असेल व अशा या इतर पक्षांना १४० पर्यंत जागा मिळू शकतील. या ‘इतर’ पक्षांमध्ये समाजवादी पक्ष, बसपा, अण्णाद्रमुक, तृणमूल काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, डावी आघाडी, मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी, बद्रुद्दीन अजमल यांचा आसाममधील ‘एआययूडूएफ’, असाउद्दीन ओवैसी यांची ‘एमआयएम’, लोकदल, आम आदमी पार्टी व अपक्षांचा समावेश असेल.विशेष म्हणजे या दोन संस्थांनी मिळून पाच राज्य विधानसभांच्या निवडणुका होण्याआधी नोव्हेंबरमध्ये जी देशव्यापी जनमत चाचणी घेतली होती त्यात ‘रालोआ’ला २८१ जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता दिसली होती. त्यावेळी ‘संपुआ’ला १२४ व ‘इतरां’ना १३८ जागा मिळणे अपेक्षित धरले होते. याचा अर्थ असा की, तीन राज्यांमधील पराभवानंतर ‘रालोआ’च्या लोकप्रियतेला ओहोटी लागली असून, त्यांच्या जागा आता आधीच्या तुलनेत २४ ने कमी होऊन ‘संपुआ’च्या २२ जागा वाढल्याचे चित्र दिसले.आघाड्यांचे संभाव्य चित्ररालोआ257भाजपा- २२३शिवसेना- ८जदयु- ११अकाली दल ५लोक जनशक्ती ३पीएमके १एनडीपीपी १एआयएनआरसी १एनपीपी १एसडीएफ १अपना दल १एमएनएफ १संपुआ आघाडी146काँग्रेस ८५राजद १०राष्ट्रवादी ९जेएमएम ४जनता दल (से) ४आरएलडी १मुस्लिम लीग २तेलगू देसम ४नॅशनल कॉन्फरन्स २केरळ काँग्रेस १इतर पक्ष140तृणमूल काँग्रेस २६समाजवादी पक्ष २०बसपा १५वायएसार काँग्रेस १९तेलंगणा राष्ट्र समिती १६बिजू जनता दल १३अण्णद्रमुक १०डावी आघाडी ८एएमएमके ४आम आदमी पार्टी २पीडीपी १जेव्हीएम १एमआयएम १