हैदराबाद - भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रचारात लक्ष घातल्याने ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक चर्चेत आली आहे. भाजपाकडून या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादमध्ये जाऊन प्रचार केला आहे. दरम्यान, या प्रचारावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपाला टोला लगावला आहे.शनिवारी लांगर हाऊस येथे झालेल्या रॅलीमध्ये ओवेसी म्हणाले की, ही निवडणूक हैदराबादची निवडणूक असल्यासारखे वाटत नाही आहे. असे वाटतेय की नरेंद्र मोदींच्या जागी पंतप्रधानपदाची निवडणूक होत आहे. मी एका सभेत असताना म्हटलं की, इथे त्यांनी सर्वांना बोलावले. तेव्हा एक मुलगा म्हणाला की, आता त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाही बोलावले पाहिजे. त्याचं म्हणणं बरोबर आहे. आता केवळ डोनाल्ड ट्रम्पच उरले आहेत. यापूर्वीही ओवेसींनी भाजपावर टीका केली होती. १ डिसेंबर रोजी जनता डेमोक्रॅटिक स्ट्राइक करेल, असा टोला लगावला होता.शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हैदराबादमध्ये आले होते. त्यांनी इथे रोड शो केला. तसेच संध्याकाळी एका सभेला संबोधित केले होते. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शुक्रवारी हैदराबादमध्ये रोड शो केला होता. या अभियानादरम्यान, आदित्यनाथ यांनी सांगितले की, काही लोक त्यांना विचारतात की, हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर केले पाहिजे का, यावर मी सांगितलं की, का नाही. एवढेच नव्हे तर आदित्यनाथ यांनी यावेळी प्रयागराजचे उदाहरणही दिले.दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजपावर टीका केली होती. काही फुटीरतावादी शक्ती शांतता भंग करण्यासाठी शहरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण त्यांना असे करू देणार का, आपण आपली शांतता भंग गमावणार आहोत का, मी हैदराबादच्या जनतेला आवाहन करतो की, तुम्ही पुढे या आणि टीआरएसला पाठिंबा द्या. हैदराबादला या फुटीरतावादी शक्तींपासून वाचवा, असे आवाहन, चंद्रशेखर राव यांनी केले होते.
आता केवळ डोनाल्ड ट्रम्प प्रचाराला यायचे राहिलेत, भाजपाचा प्रचार पाहून ओवेसींचा टोला
By बाळकृष्ण परब | Published: November 29, 2020 1:28 PM
Asaduddin Owaisi News : भाजपाकडून हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादमध्ये जाऊन प्रचार केला आहे.
ठळक मुद्देही निवडणूक हैदराबादची निवडणूक असल्यासारखे वाटत नाहीअसे वाटतेय की नरेंद्र मोदींच्या जागी पंतप्रधानपदाची निवडणूक होत आहेआता केवळ डोनाल्ड ट्रम्प प्रचाराला यायंचे राहिलेत