शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

यापुढे ‘नीट’ परीक्षेचे सर्व भाषांमधील पेपर एकसारखेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:57 AM

देशभरातील वैद्यकीय प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पुढील वर्षापासून सर्व भाषांमध्ये एकसारख्याच

कोलकाता : देशभरातील वैद्यकीय प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पुढील वर्षापासून सर्व भाषांमध्ये एकसारख्याच असतील व त्यात भाषेगणिक वेगवेगळे प्रश्न असणार नाहीत.केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांना सांगितले की, सन २०१८ पासून ‘नीट’ परीक्षेच्या इंग्रजीखेरीज इतर भाषांमधील प्रश्नपत्रिका वेगळ््या असणार नाहीत तर त्या मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिकेचे फक्त साधे, सरळ भाषांतर असेल. त्यामुळे वेगवेगळ््या भाषेतील प्रश्नपत्रिकांमध्ये निरनिराळे प्रश्न असणार नाहीत.यंदाच्या ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदीमध्ये एकसारखी होती. मात्र, इतर भाषांमधील प्रश्नपत्रिकांमध्ये त्याहून वेगळे आणि काही ठिकाणी अधिक कठीण प्रश्न होते. यावरून वाद झाला होता व मद्रास उच्च न्यायालयाने यावरून निकालास अंतिम स्थगिती दिली होती. नंतर सर्वोच्च न्यायालायने ही स्थगिती उठविली खरी, पण निकाल ठरल्या तारखेला लागू शकला नव्हता.‘नीट’ परीक्षा देणाऱ्यांची संख्या कित्येक लाखांत आहे. शिवाय प्रश्नपत्रिकाही अनेक भाषांमधून काढाव्या लागतात. त्यामुळे मूळ प्रश्नपत्रिका इंग्रजीमध्ये तयार करून त्याचे इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतर करायचे म्हटले तर त्यातून कदाचित प्रश्नपत्रिका परिक्षेआधीच फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे निव्वळ भाषांतर न करता ढोबळ मानाने तेच प्रश्न कायम ठेवून भाषावार स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार केल्या गेल्या होत्या, असे समर्थन ही परीक्षा घेणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केले होते. जावडेकर यांचे आताचे उत्तर पाहता मंडळाची ही सबब मंत्रालयाने हाणून पाडल्याचे दिसते.वैद्यकीयच्या धर्तीवर ‘एक देश, एक प्रवेश परीक्षा’ या सूत्रानुसार अभियांत्रिकी प्रवेशांसाठीही देशपातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार नाही, असेही जावडेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.ते म्हणाले की, वैद्यकीय प्रवेशंसाठीच्या ‘नीट’ परिक्षेचे यंदा पहिलेच वर्ष होते. त्याचे निकालोत्तर फलित काय होते ते पाहावे लागेल. त्यामुळे अभियांत्रिकीसाठीही अशी परीक्षा घेण्याचा विषय सध्या फक्त चर्चेच्या पातळीवर आहे. (वृत्तसंस्था)५ वी, ८वीची होणार परीक्षाइयत्ता पहिली ते आठवीपर्यंत कोणाचीही परीक्षा घ्यायची नाही व कोणालाही त्याच इयत्तेत ठेवायचे नाही, या धोरणामुळे विद्यार्थ्यांचेच नुकसान होत असल्याचे दिसून आल्याने यात सुधारणा करण्यासाठी संसदेत लवकरच एक दुरुस्ती विधेयक मांडले जाईल, असेही जावडेकर यांनी सांगितले.त्यानुसार, इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची मार्चमध्ये परीक्षा घेतली जाईल. त्यात जे अनुत्तीर्ण होतील त्यांना मे महिन्यात पुन्हा एक परीक्षा घेऊन उत्तीर्ण होण्याची संधी दिली जाईल. मात्र, मेमधील परीक्षेतही उत्तीर्ण न होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच इयत्तेत ठेवले जाईल. हा बदल स्वीकारणे राज्यांना ऐच्छिक असेल व २५ राज्यांनी त्यास संमती दिली आहे, असेही जावडेकर म्हणाले.