शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

बाललैंगिक गुन्हेगारांचा आता मानसिक अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 4:34 AM

बाल अधिकार क्षेत्रातील सर्वोच्च संस्था एनसीपीसीआरने एम्सला सोबत घेऊन बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांचा मानसिक अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील देवरिया आणि बिहारातील मुजफ्फरपूर येथील बालगृहांत बालकांवर झालेल्या गंभीर लैंगिक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बाल अधिकार क्षेत्रातील सर्वोच्च संस्था एनसीपीसीआरने एम्सला सोबत घेऊन बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांचा मानसिक अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) मे महिन्यात एम्सच्या अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात एक बैठक घेतली होती. बालगृहातील मुले आणि किशोरांवरील लैंगिक अत्याचाराचा अभ्यास करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार अशा गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास केला जाणार आहे.या अभ्यासातून बाल लैंगिक गुन्हेगारांची मानसिक रूपरेखा (सायकॉलॉजिकल प्रोफायलिंग) तयार केली जाणार आहे. ‘सायकॉलॉजिकल प्रोफायलिंग आॅफ माइंड आॅफ इनकार्सरेटेड चाईल्ड सेक्शुअल आॅफेंडर इन इंडिया : इम्प्लिकेशन फॉर डेव्हलपमेंट आॅफ ट्रिटमेंट इंटरव्हेन्शन’ असा या अभ्यासाचा विषय असेल.एनसीपीसीआरने जारी केलेल्या निवेदनानुसार, या प्रस्तावाची आधी समीक्षा केली जाईल. एम्सशी सल्लामसलत केली जाईल. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर अभ्यास सुरू केला जाईल. उत्तर प्रदेशातील देवरिया आणि बिहारातील मुजफ्फरपूर येथील बालगृहांत लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर हा अभ्यास करण्याचा आदेश देण्यात आला आहे.बालगृहात झाले होते अत्याचारगेल्या वर्षी मुजफ्फराबादच्या बालगृहातील ३४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. याप्रकरणी बालगृहाचे संचालन करणाºया स्वयंसेवी संस्थेचा मालक ब्रजेश ठाकूर याच्यासह ११ जणांवर एफआयआर नोंदविण्यात आला होता.गेल्या वर्षीच्याच अन्य घटनेत उत्तर प्रदेशातील देवरिया येथील बालगृहात बालकांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळून आले होते. एक १0 वर्षीय मुलगी बालगृहातून पळून आल्यानंतर ही घटना उजेडात आली होती. बालगृह चालविणारे जोडपे बालगृहातील २४ मुलींचे लैंगिक शोषण करीत असल्याचे समोर आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारत