शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
3
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
4
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
5
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
6
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
7
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
8
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
9
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
10
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
11
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
12
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
13
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
15
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
16
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
17
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
18
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
19
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
20
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा

आता रामलीलेतील रामसुद्धा मोदींचा मुखवटा घालून येईल

By admin | Published: January 16, 2017 4:10 PM

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

ऑनलाइन लोकमत 
ऋषिकेश, दि. 16 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदींना दिखावूपणाची फार आवड असून, आता तो दिवस दूर नाही जेव्हा रामलीलेमधील रामसुद्धा मोदींचा मुखवटा घालून येईल, अशा शब्दात राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.  
ऋषिकेश येथे प्रचासभेला संबोधित करताना राहुल गांधी  म्हणाले,  "नोटाबंदीचा निर्णय घेऊन मोदींनी एका मिनिटात आरबीआयसारख्या मोठ्या संस्थेची हत्या केली . आतातर, ज्या व्यक्तीने तिरंग्यासाठी छातीवर गोळ्या झेलल्या, त्याच व्यक्तीचे छायाचित्र मोदींनी हटवले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 52 वर्षे आरएसएसच्या मुख्यालयावर तिरंगा फडकत नव्हता, ते भगव्या झेंड्यालाच सलामी देत होते, त्यामुळे आता तो दिवस दूर नाही जेव्हा रामलीलेतील रामसुद्धा मोदींचा मुखवटा घालून येईल."
राहुल गांधींनी मोदींवरील टीकेची धार अधिक वाढवताना त्यांच्या उद्योगपतींसोबत असलेल्या सबंधांचाही पुनरुच्चार केला."चरखा हे गरिबाच्या कमाईचे साधन  आहे,  मोदी चरख्यासोबत फोटो घेतात आणि दिवसभर 50 उद्योगपतींसाठी काम करतात." असे ते म्हणाले. तसेच नोटाबंदीचा निर्णय एका मिनिटात घेऊन टाकला, तसा OROPचा निर्णयही झटपट घेऊन टाका, असे आव्हानही राहुल गांधी यांनी मोदींना दिले. यावेळी राहुल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची तुलना वाघाशी केली, तर भाजपच्या कार्यकर्त्यांची तुलना धमकावणाऱ्या गुंडांशी केली.