सोशल मीडियावर सध्या Reel नं अनेकांना वेड लावलं आहे. मेट्रो, बस, रेल्वे कुठेही जाल तेव्हा लोकांच्या हाताची बोटे स्मार्टफोनच्या स्क्रिनवर स्क्रोल करताना दिसतात. बहुतांश लोकांना शॉर्ट व्हिडिओ रिल्स बघण्यास रस असतो. सोशल मीडियावर अधिकाधिक वेळ यातच जातो. मात्र ही तर फक्त सुरूवात आहे असं तुम्हालाही वाटेल कारण देशातील २ बड्या केबल टीव्ही पुरवठादार कंपन्यांनी रिल्स बेस्ड चॅनेल लॉन्च केला आहे.
रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीच्या मालकीचे हॅथवे डिजिटल आणि डेन नेटवर्क्स यांनी हे काम सुरू केले आहे. शॉर्ट फॉर्म व्हिडिओसाठी २ नवीन चॅनेल हॅथवे रिल्स आणि डेन रिल्स लॉन्च करण्यात आलेत. आता ज्या गोष्टी मोबाईलवर सर्वाधिक वापरल्या जातात त्या टीव्हीवर का आणलं जातंय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. परंतु हे पाऊल इन्स्टाग्राम रिल्स आणि युट्यूब शॉट्ससारख्या सोशल मिडिया प्लॅटफोर्मवरील ट्रेंडिंग व्हिडिओ टीव्हीवर दाखवण्यासाठी उचललं आहे. कंपन्या यातून अशा युवा वर्गाला आकर्षिक करू इच्छिते ज्यांचा जास्त वेळ रिल्स बघण्यात जातो.
TV वर रिल्स पाहणं असणार मोठं आव्हान
या नवीन २ टीव्ही चॅनेलवर डान्स, गायन, अभिनय आणि कॉमेडी संबंधित रिल्स दाखवण्यात येतील. लोक त्यांच्या रिल्स या चॅनेलवर पाठवू शकतात. जो कन्टेंट निवडला जाईल तो टीव्हीवर प्रसारित करण्यात येईल. त्यातून कन्टेंट क्रिएटर्सला त्यांचे टॅलेंट दाखवण्यासाठी नवीन व्यासपीठ मिळेल. मोबाईलवर लोक त्यांच्या वेळेनुसार हवे ते आवडीचे रिल्स पाहतात परंतु टीव्हीवर एका टाइम स्लॉटमध्ये प्रेक्षकांना आकर्षिक करणे आव्हान असणार आहे. परंतु पालकांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. सध्याची मुले मोबाईलवर जास्त वेळ रिल्स, शॉर्ट व्हिडिओ पाहण्यात घालवतात. जर त्यांना टीव्हीवर रिल्स पाहायला पर्याय मिळाला तर पालकांना त्यातून दिलासा मिळू शकतो.
ज्यांच्या घरी इंटरनेट नाही, त्यांनाही पर्याय
जे ग्राहक मोबाईल डेटा घेतात, त्यावर इंटरनेटचा वापर जास्त होतो. ज्यांच्या घरी वायफाय नाही अशा ग्राहकांना टीव्ही रिल्स पाहण्याचा पर्याय उपलब्ध होईल. या दोन्ही चॅनेलचं प्राधान्य युजर जेनरेटेड कन्टेंटला प्राधान्य देणे हे आहे. हे युवकांना आकर्षिक करण्यासाठी आणलं असावे असं इंडस्ट्रीतील जाणकार आणि मार्केट तज्ज्ञांना वाटते. हॅथवे आणि डेन इन्फ्ल्युएंसर ड्रिवन आणि यूजर जनरेटेड कन्टेंटला ट्रेडिशनल ब्रॉडकास्टिंगमध्ये मिळून नवा हायब्रिड कन्टेंट मॉडेल बनवत आहेत.