अलवार : स्वयंघोषित संत कौशलेंद्र फलाहारी महाराज याच्यावर छत्तीसगढच्या २१ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. बलात्काराची तक्रार दाखल करायची तरुणीच्या पालकांची तयारी नव्हती. परंतु गुरमीत राम रहीमला शिक्षा झाल्याचे वाचल्यानंतर त्यांनी तक्रार करण्याचा निर्णय घेतला.बिलासपूर (छत्तीसगढ) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चौकशी अधिकारी बुधवारी अलवारला दाखल झाले. ते आल्याचे समजताच आरोपी फलाहारी महाराजाने पोटात संसर्ग झाल्याचे सांगून स्वत:ला रुग्णालयात दाखल करून घेतले.पीडित तरुणीने म्हटले की, मी ७ आॅगस्ट रोजी फलाहारी महाराजाच्या दिव्य धाम आश्रमाला भेट दिली. माझे पहिले वेतन या महाराजाला अर्पण केले. महाराजाने मला त्या रात्री तेथेच थांबायला सांगितले. महाराजाने सायंकाळी ७ वाजता बोलावून बलात्कार केला.
आता स्वयंघोषित संत कौशलेंद्र फलाहारी महाराजावरही बलात्काराचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 4:43 AM